आज गुरुपौर्णिमा आहे आज आपण श्रद्धा सुमन आपल्या गुरूंच्या चरणी वाहतो. आपले प्रथम गुरू आई वडील जे आपल्याला संस्कार देतात. दुसरे गुरु आपले शिक्षक जे आपल्याला ज्ञान प्रदान करतात.
आई-वडील आणि शिक्षक निवडणे आपल्या हातात नसते पण संसार उत्तम करण्यासाठी आणि परमार्थ साधण्यासाठी गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. विद्यमान आणि पूर्वकाळात झालेल्या महान संत, महात्मांपासून आपण प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतो, ते आपले आध्यात्मिक गुरु.
आता गुरु कुणाला करावे, हा प्रश्न आपल्या समोर येतो. समर्थ रामदास म्हणतात, "बोलण्यासारीखें चालणें l स्वयें करून बोलणेंl तयाची वचनें प्रमाणेl मानिती जनीl" बोलणे आणि कर्म ज्याचे एक सारखे त्याला गुरू मानावे. एक उदाहरण स्वामी रामदेव यांना लोक योग गुरू म्हणतात. कारण ते स्वतः सकाळी तीन तास नियमित योग ही करतात आणि करूवून घेतात. जगाच्या कुठल्याही टोकाला असेले तरीही भारतीय वेळे प्रमाणे सकाळी पाच वाजता त्यांची योग कक्षा सुरू होते. त्यात कधीच बाधा येत नाही. असेच गुरु आपल्याला शोधले पाहिजे. दुसरा प्रश्न गुरूकडून आपण काय शिकायचे जेणे करून संसार सुरळीत होईल. भागवतात "कृष्ण वंदे जगद्गुरु" असे म्हटले आहे. श्रीकृष्णाला जगतगुरु म्हणतात कारण त्यांनी निस्वार्थ भावनेने अधर्माच्या विनाशासाठी आयुष्यभर कार्य केले. पृथ्वीवर सत्य आणि धर्माची स्थापना केली. असे करताना श्रीकृष्णाचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता फक्त समाजाचे कल्याण हाच त्यांचा आयुष्याचा उद्देश्य होता. त्यांनी चंगाई चमत्कार केले नाही, जादू - टोणा केला नाही, कोणाची घोडी शोधून दिली नाही, पाण्यात दिवे लावले नाही, आणि कुणावर कृपाही बरसवली नाही. श्रीकृष्णाने संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला सत्य आणि धर्माचा मार्गावर चालत निष्काम कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्याला असेच गुरु शोधले पाहिजे.
शेवटी आपण एक लक्षात ठेवले पाहिजे गुरू काही व्यक्तिगत स्वार्थ सिद्ध करण्याचे साधन नाही. कुणी तसे आश्वासन देत असेल तर निश्चित तो गुरू करण्यायोग्य नाही.
माझे म्हणाल तर मी श्रीकृष्णाला, समर्थ रामदास, स्वामी दयानंद आणि त्यांच्या परंपरेला स्वीकार करून समाजाच्या आर्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे कार्य करतात त्यांना गुरू समान मनातो आणि प्रेरणा घेतो.
No comments:
Post a Comment