जाणते लोक ते शहाणे.
नेणते वेडे दैन्यवाणे.
विज्ञान तेही जाणपणे.
कळो आले.
समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते.
समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रपंच उत्तम करण्यासाठी जाणण्याचे विज्ञान ही समजण्याची गरज आहे. उदाहरण- एका शेतकऱ्याला उत्तम शेती करायची आहे. फक्त बी पेरून, खत-पाणी देऊन उत्तम शेती होत नाही. शेत जमिनीची पोत, पाण्याचे व्यवस्थापन, त्या भागातील हवामान, हवामान खात्याचे अंदाज, शेतीचे नवीन-नवीन तंत्र, कृषी विशेषज्ञांचे मार्गदर्शन, दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, विभिन्न ऋतूत शेतमालला मिळणारा बाजार भाव, प्राकृतिक विपत्ती- अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, आग, काळ-वेळ, सरकारची आयात- निर्यात नीती, एमआरपी, प्रोत्साहन अनुदान, इत्यादी सर्व जाणून शेती करणे म्हणजे शेतीचे विज्ञान जाणणे. अनुभवाने हे विज्ञान सिद्ध होते. असा शेतकरी आत्महत्या ही करत नाही, दुःखी आणि दरिद्री राहत नाही. दुसरे शेतकरी त्याच्या पासून प्रेरणा घेतात. जे लोक जाणण्याचे विज्ञान समजतात ते उद्योग-धंदे, व्यापार सर्व ठिकाणी सफल होतात.
आत्ताचेच एक उदाहरण- मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटो शंभर रुपये किलोच्या भावाने विकले. असो.
No comments:
Post a Comment