आज सकाळी फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे, महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का? उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.
Monday, August 8, 2022
आज मी पेढे केले
पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळले. ते चार ते पाच मिनिटे
व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून जाईल. मला काम करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला, काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्...
-
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे...
-
शनिवारी संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून द...



No comments:
Post a Comment