Friday, July 17, 2020

प्रदूषण देत्य आणि सौर चक्र.


फार पूर्वी  ईक्ष्वाकु वंशाचा राजा भगीरथ पृथ्वीवर राज्य करत होता. एक दिवस पाताळातून हलाहल नावाचा दैत्य पृथ्वीवर आला. त्याने प्रजेला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे आमिष दाखविले. प्रजा त्याच्या विळख्यात न कळत सापडली. हलाहल दैत्य विषाक्त वायुने प्रजेचे प्राण घेऊन आपली भूक शमन करून लागला. भगीरथाने हलाहल दैत्य विरुद्ध युद्ध पुकारले.  पण भगीरथाचे अस्त्र-शस्त्र हलाहल दैत्य समोर निष्फळ ठरले.  

अखेर भगीरथाने जगाला  उर्जा प्रदान करणार्या सूर्यदेवाची आराधना सुरु केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. सूर्यदेवाने भगीरथाला सौर चक्र प्रदान केले.  या सौर चक्राच्या मदतीने भगीरथाने हलाहल दैत्याला पराजित केले. हलाहल दैत्य पुन्हा पाताळात जाऊन दडून बसला.

No comments:

Post a Comment