Wednesday, July 22, 2020

आचार्य कुलं, हरिद्वार आणि दिल्लीतील वीआयपी भागांतील शाळा तुलनात्मक परीक्षा परिणामकाही दिवसांपूर्वी इंडिया टीवी वर आचार्य कुलंच्या मुलांना योगाभ्यास करता पाहून माझा एक सहकारी म्हणाला. बाबांच्या शाळेत मुलांना टाकणे व्यर्थ. योगाभ्यास करण्याने कुणाचे भविष्य बनत नाही. त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या आंग्ल भाषी शाळेत टाकणे गरजेचे.  तो म्हणाला अनेक सरकारी कर्मचारी स्वत:चे घर असूनही क्वार्टर घेतात त्याचे कारण या भागातील चांगल्या शाळा अर्थात सेंट कोलंबस, डीपीएस इत्यादी. या शाळांत अधिकांश अधिकारी आणि बाबूंची मुले शिकतात. या शाळांत प्रवेश घेण्यासाठी अनेक पापड लाटावे लागतात. या शिवाय मुलाचे शैक्षिणिक प्रदर्शन चांगले नसेल तर शाळेतून हकालपट्टीहि होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक  महागाच्या  कोचिंग क्लासवरहि  भरपूर पैसा खर्च करतात. दुसरीकडे आपल्या गौरवशालीपरंपरेवर विश्वास ठेवणारी मध्यमवर्गातील पालकांची मुले आचार्यकुलं मध्ये शिकायला येतात. माझा सहकारी म्हणाला आचार्यकुलंचा परीक्षा परिणाम या शाळांचा जवळपास हि नसणार.  मुले पैदा होताच त्यांच्याशी आंग्ल भाषेत "गुटर गू" करणाऱ्या मानसिक गुलाम फक्त भगव्या वस्त्रावरून शाळेच्या शिक्षणाची कल्पना करतात. अर्थातच १२वी परीक्षा परिणाम बघितल्या वर त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.  असे कसे होऊ शकते हीच त्याची प्रतिक्रिया. बाकी या सर्व शाळांचा परिणाम  नेहमी सारखा उत्तम होता तरीही आचार्य कुलं शाळेचा त्यांच्यापेक्षाहि जास्त उत्तम होता.  पतंजलि संचालित  आचार्यकुलं बहुतेक एकमात्र शाळा असावी जिथे शरीर आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असलेले विद्यार्थी निर्माण होतात. याशिवाय तिथे शिक्षण हि अत्याधुनिक आहे, बहुधा अधिकांश मानसिक गुलामांना माहित हि नसेल.

प्रत्येक शाळेतील प्रथम आलेल्या  विद्यार्थ्याचे प्रतिशत

आचार्यकुलं, हरिद्वार  :                           ९९.४ %
सेंट कोलम्बस, गोल डाक खाना :            ९८.४ %
डीपीएस, मथुरा रोड :                            ९९.००%
डीपीएस, आर के पुरम :                         ९८.८%

आचार्य कुलं हरिद्वार

विद्यार्थी                      ७७
९०% पेक्षा जास्त         38       49.35%
75% पेक्षा जास्त         73       99.49%
60% पेक्षा जास्त         77       100%
सेंट कोलंबस गोल डाकखाना

विद्यार्थी                     २४२
९०% पेक्षा जास्त        ५२    २१.४८%
75% पेक्षा जास्त       १६७   ६८.१८%
60% पेक्षा जास्त       २३४    ९५.८६%
डी पी एस मथुरा रोड
कुल विद्यार्थी              ४११ 
९०% पेक्षा जास्त        १७५     ४२.५७%
75% पेक्षा जास्त        ३७६     ९१.४८%
60% पेक्षा जास्त        ४१०      ९९.७५%
डी पी एस  आर के पुरम
कुल विद्यार्थी            ८७८
९०% पेक्षा जास्त      ५५७     ६३.४३%
75% पेक्षा जास्त       ८४१     ९५.78.%
60% पेक्षा जास्त      ८७८      100%
  
https://www.dpsmathuraroad.org/cbse-result-xii-2019-20.php                         
No comments:

Post a Comment