Thursday, July 16, 2020

प्रदूषण : वेताळ आणि विक्रम


विक्रमा, पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या प्रदूषणासाठी उत्तरदायी कोण? तुला माहित असूनहि खरे उत्तर दिले  नाही तर तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होतील. विक्रम म्हणाला, वेताळ, मानव निर्मित कचरा, प्लास्टिक, पेट्रोलचा धूर इत्यादीमुळे प्रदूषण पसरते. यांचा निर्माता मनुष्य प्राणी असल्यामुळे मानवच उत्तरदायी आहे. वेताळ खदाखदा हसला, विक्रम हा मी चाललो म्हणत वेताळ आकाशी उडाला, पण त्याला दूर-दूर कुठेही झाड दिसले नाही. शेवटी थकून-भागून वेताळ एका विजेच्या खांबावर लटकला.  ४४० वाॅटचा जोरदार करंट त्याला लागला. वेताळ धाडकन जमिनीवर आपटला. त्याला मुक्ती मिळाली आणि विक्रम प्रदूषणच्या नरकात तडफडत मरण्यासाठी जिवंत राहिला. 

(श्री सुभाष पी. नाईक यांच्या धरा धरोहर कविता संग्रहापासून पासून प्रेरणा  घेऊन)


No comments:

Post a Comment