Wednesday, January 16, 2019

कहाणी: कारे बामना पादलास तू.



महाराष्ट्र देशात कुडंनपुर नावाचे राज्य होते. दरबार सजलेला होता. अचानक भयंकर वास दरबारात पसरला. कुणीतरी महाभयंकर असा ठुसकी पाद मारला होता. महाराजांनी नजर चौफेर फिरवली. सर्व दरबारी नाक दाबून बसले होते. ते पाहून महाराजांना राग आला. ते प्रधानजीवर डाफरले, प्रधानजी कोण पादले इथे, शोधून काढा. प्रधानजी हुशार होते, प्रधानजींना वास महाराजांच्या दिशेने येताना वाटत असला तरीही महाराजांच्या आदेशानुसार, बळीचा बकरा शोधणे क्रमप्राप्त होते. प्रधानाने सर्वप्रथम महाराजांच्या शेजारी बसलेल्या महाराणीसाहेबांवर वर नजर टाकली. मनात विचार केला, महाराणी पादल्या असतील का? छे! छे! महाराणीसाहेबा  खरोखर पाद्ल्या असतील तरी  त्यांच्यावर आळ घेणे योग्य नाही. घेतला तर उद्या आपली गच्छन्ति निश्चित. मग प्रधानाने सेनापतीकडे बघितले. सेनापती महोदयांचा उजवा हात तलवारीच्या मूठवर होता. प्रधानाने विचार केला, सेनापतीवर आळ घेणे म्हणजे जीवाची जोखीम, विषाची परीक्षा पाहण्यात अर्थ नाही.  प्रधानाने आता आपली नजर राजवैद्याच्या दिशेने नजर वळवली. वैद्य म्हणजे "यमराजाचा सहोदर", त्याच्यावर आरोप घेतला तर उद्या रोगराई झाल्यावर हा आपल्यास जालीम औषध देण्यास कमी करणार नाही. शेवटी उरला राजपुरोहित, प्रधानाने विचार केला, हा म्हातारा आपले कुठलेच नुकसान करु शकत नाही. त्याचेकडे पहात प्रधानजी म्हणाले, ठाम ठुस्स ठैन्या ठुस्स कारे बामना पादला तूच. बेचारे ब्राह्मण देवता, थक्क होऊन प्रधानजीकडे पाहतच राहिले. ते पादले नव्हते तरी प्रधानजीने त्यांच्यावर का बरे आळ घेतला, यावर काय बोलावे राजपुरोहिताला सुचेनासे झाले. राजपुरोहिताची गोंधळलेली अवस्था पाहत, मौक्याचा फायदा घेत राजवैद्य म्हणाले, "हे यजमानांच्या घरी मेजवान्या झाडतात. यांना कित्येकदा म्हंटले आहे, थोड खाणे कमी करा, पण ऐकतच नाही. आता यांनी काही दिवस लंघन करावे, पोट ठीक होईल. असे भर दरबारात पादणार नाही".   महाराणीसाहिबांना काही आठवले, त्या म्हणाल्या, माझ्या मनात अनेक दिवसांपासून विचार येत आहे, महाराजांनी  युद्धात विजय प्रदान करणार्या रणचंडीचे व्रत करावे.  या व्रतात २१ दिवस उपवास करावा लागतो. महाराजांना उपवास करणे जमत नाही. त्यांच्यावतीने राजपुरोहिताने हे व्रत करावे. सेनापतीहि लगेच म्हणाले, उत्तम विचार आहे, महाराणीसाहेब. खरे तर हा सर्व प्रकार पाहून महाराजांना हसू येत होते. पण आपले हसू दाबत, महाराज  म्हणाले, सर्वांची इच्छा आहे मी रणचंडीचे व्रत करावे. राजपुरोहित माझ्यावतीने २१ दिवस उपवास करतील. प्रधानजी आता तुम्ही या व्रताची तैयारी करा. व्रत संपन्न झाल्यावर राजपुरोहिताला यथायोग्य दक्षिणा द्या. बेचारे राजपुरोहित, त्यांच्या नशिबी  खोटा आळ आणि २१ दिवस उपाशी राहण्याची पाळी आली. 

त्या दिवसापासून महाराष्ट्रात काहीही घडले तरी त्याचा आळ ब्राह्मणांवर घेण्याची पद्धत रूढ झाली आणि हि म्हण: ठाम ठुस्स ठैन्या ठुस्स कारे बामना पादला तूच.

1 comment: