काल आमच्या घरी विदर्भातून पाहुणे आले होते. त्यांची विदर्भात ३० एक एकर शेती आहे. सहज शेतीचा विषय निघाला. स्वत:च्या शेतीबाबत ते सांगू लागले. काही वर्षांपासून ते जैविक शेती करतात. शेतात विषाक्त खाद किंवा किटाणू नाशकांचा प्रयोग करत नाही. १०० टक्के नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक उत्पाद. ते शेतीत नित नवीन प्रयोग हि करतात. बोलताना त्यांचा उत्साह जाणवत होता. एकदाही शेतमालाचे कमी भाव, कर्जमाफी, ईत्यादी शब्द त्यांच्या मुखातून ऐकले नाही.
शेतकरी आत्महत्या हा विषय निघाला. आपल्या देशात शेतकरी हजारो वर्षांपासून शेती करत आहे. वरूण राजाने दगा दिला तर अनेक वर्ष दुष्काळ हि पडत होता. त्या वेळी आजच्या सारखे दळणवळणाचे साधन नव्हते. जनतेची चिंता करणारे शासक हि नव्हते. मोठे राज्य असेल तर, आपल्या राज्यातील एका भागात दुष्काळ पडला आहे, हि बातमी राजा पर्यंत पोहचत हि नव्हती. पोहचली तरी फार उशीर झालेला रहायचा. त्या वेळी दुष्काळी भागात मदत पोहचविणे हि दुष्कर कार्य होते. अश्या बिकट परिस्थितीत गाई बैल तर सोडा बायका मुलांना हि विकायची पाळी हि बळीराजावर यायची. एक वेळच्या जेवणासाठी परदेसी गुलामगिरी हि सहन करावी लागायची. तरीही आत्महत्येचा विचार बळीराजाच्या मनातही यायचा नाही. एक मात्र खरं, त्या काळी बळीराजा विषाक्त रसायनांचा उपयोग हि शेतीत करायचा नाही.
आज म्हणाल तर कुठे दुष्काळ पडला तर त्याचा ढोल मिडीयात जोरात वाजतो. सरकारी मशिनरी किती हि भ्रष्ट असली किमान ९० टक्के लोकांपर्यंत अन्न-धान्याची मदत पोहचतेच. कर्ज माफी इत्यादी हि होत राहतात. तरीही आज बळीराजा आत्महत्या करतो. का? शेवटी आत्महत्येचा विचार त्याच्या मनात का येतो?
गीतेत भगवंतानी म्हंटले आहे, कर्मांची फळे कुणालाच चुकत नाही. आज बळीराजा अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक उर्वरक आणि कीट नाशक टाकतो. ७० टक्के विषाक्त रसायने जमिनीच्या पाण्यात व व वातावरणात मिसळतात. हेच पाणी पशु, पक्षी, मनुष्यसहित सर्व जीवित प्राणी पितात, विषाक्त हवेत स्वास घेतात, विषाक्त अन्न, भाजी-पाला खातात आणि विभिन्न रोगांनी ग्रस्त होऊन मरतात.
नुकतीच एक बातमी वाचली नोएडातील अच्छेजा गावातील लोकांसोबत कुणी हि रोटी बेटीचा व्यवहार करत नाही. कारण तिथेले अनेक रहिवासी कैन्सरग्रस्त होऊन मेले. कारण तिथले पाणी दूषित झालेले आहे. हीच परिस्थिती संपूर्ण पंजाब, हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण भागात आहे. ह्या सर्वांचा दोषी कोण. बळीराजाच. मग कर्मांचे फळें त्याला हि भोगावे लागतात. आपण बातम्या ऐकतोच, विषाक्त किट नाशक शेतात फवारताना तीच विषाक्त वायू बळीराजाचा हि प्राण घेते. निराशाच्या एका क्षणी तेच विषाक्त रसायन पिऊन बळीराजा स्वत:चा आणि परिवाराचा प्राण घेतो. जे विष शेतात पेरले, तेच विष त्याचे प्राण घेणारच. हेच प्राक्तन.