दुपारचे १ वाजले होते, पित्ज्झा बॉयला अर्ध्या तासात ३ पित्ज्झे डिलिवर करायचे होते. उशीर झाला तर ग्राहक पैसे देणार नाही आणि मालिक पगार हि नाही. पित्ज्झा बॉयच्या नौकरीत वेळेचेच महत्व. बाईक स्टार्ट करून तो निघाला. तापलेल्या गरमागरम सीटचे चटके त्याला बसू लागले. आजीने सांगितलेली गोष्ट आठवली, "कोल्होबा-कोल्होबा बोरोली पिकली, नाही नाही आजीबाई ढुंगोली शेकली". त्याच्या मनात विचार आला गाव सोडून आपण या शहरात पैसे कमवायला आलो कि ढुंगोली शेकायला. चौरस्त्यावर पोहचतात समोर रेड लाईट दिसली. दिल्लीची रेड लाईट, च्यायला आता चक्क ५ मिनिटे थांबावे लागेल. बाजूला उभी डीटीसीची एसी बसच् गरमागरम धूर सोडत होती. पुढे थांबलेल्या डीजेल गाडीचा सहन न होणारा धूर नाकाला झोंबत होता. वर आकाशात बघितले, सूर्य हि प्रचंड ताकदीने आग ओकत होता. त्याचे शरीर चोहू बाजूने भाजले जात होते. त्याच्या मनात विचार आला, पुढच्या चौरसत्यावर हि लाल बत्ती भेटली तर आज आपण नक्कीच पित्ज्झाप्रमाणे खरपूस भाजले जाऊ. माणसाच्या पित्ज्झाचा स्वाद कसा असेल. माणसाच्या पित्ज्झ्याला स्वादिष्ट बनविण्यासाठी कोणते चीज, सौस भाज्या, टाॅॅपिंग इत्यादी पित्ज्झ्यावर टाकावे लागतील??? बहुतेक चिड़ियाघरातले वाघ, सिंह सांगू शकतील. तेवढ्यात लाईट हिरवी झाली त्याने पुढे बाईक हाकली. आजकल आपल्या डोक्यात चित्र-विचित्र विचार का येतात? हे ठीक नाही. त्याला त्याच्या बायको आणि छोट्या बाळाची आठवण आली. त्यांच्यासाठी,आपल्याला भरपूर जगायचे आहे, मनातले विचार झटकून त्याने रस्त्यावर धावणाऱ्या ट्राफिकवर लक्ष केंद्रित केले.
अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा
बघितला. चेहर्यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण
लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे...... जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे.....
No comments:
Post a Comment