अवकाश नाही चावायला.
अवघा बोकणा भरिला.
पुढें कैसें.
समर्थ म्हणतात तोंडामध्ये एका मागून एक बोकणा वाघ मागे लागल्यासारखा आपण भरत राहिलो तर आपले काय होणार. समर्थांना आरोग्य शास्त्राचे उत्तम ज्ञान होते, हे या ओवी वरून सिद्ध होते. समर्थांनी या ओवीत शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जेवण कसे करावे हे सांगितले आहे.
जेवणाचा मुख्य उद्देश्य शरीराला उत्तम पोषण मिळाले पाहिजे. आपले शरीर स्वस्थ्य असेल तरच आपण आपले सांसारिक आणि अध्यात्मिक उद्दिष्ट सिद्ध करू शकतो. म्हंटलेच आहे "शरीर मध्यम खलु धर्म साधनं".
आपल्या परंपरागत वैद्यकीय शास्त्रात म्हंटले आहे, माणसाने तोंडातील अन्नाच्या घासाला किमान 32 वेळा दांतानी चर्वण केले पाहिजे. जेवढे जास्त आपण अन्नाला चावतो, अन्नाचे तेवढे लहान तुकडे होतात आणि तेवढी जास्त लार अन्नात मिसळते. पोटात अन्नाचे पचन उत्तमरीत्या होते. अन्नात असलेले सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात. याशिवाय दातांचा उत्तम व्यायाम ही होतो. दात ही मजबूत राहतात. पण आजच्या धगधगीच्या युगात अधिकांश लोक भूक शमविण्यासाठी भरभर जेवतात. अन्नाचे छोटे तुकडे होत नाही. आपल्या पचन संस्थेला हे जेवण पचविता येत नाही. बिना चावता लवकर लवकर अन्न गिळले तर पोटात अन्नाचे पचन होणार नाहीच आणि पोषक तत्व ही शरीराला मिळणार नाही. परिणाम आज देशातील अधिकांश जनता पोटाच्या विकारांनी ग्रस्त आहे.
आयुर्वेदाच्या मते पोट हे अधिकांश रोगांचे मूळ कारण आहे. अन्न न पचल्यामुळे पोटाची जळजळ होते, पोटात गॅस होते, पोटावर सूज येते, वजन वाढते, आंतड्यात अनेक रोग उत्पन्न होतात, नेहमी पोट दुखत राहते इत्यादी. माणूस चिडचिड करू लागतो, कामात लक्ष लागत नाही. अधिकांश वात रोगांचा, सर्व प्रकारच्या दुखण्यांचा पोटाशी थेट संबंध आहे. पोटाकडे सतत दुर्लक्ष केले तर हृदयरोग, मधुमेह, केंसर इत्यादी होण्याचीही शक्यता वाढते. असो.
ही ओवी वाचून आपण शांतपणे बसून अन्न चावून चावून जेवायला सुरुवात केली तरच ओवी वाचणे सार्थकी लागेल. असो.
No comments:
Post a Comment