Tuesday, March 28, 2023

वार्तालाप (8): "वर्णानां ब्राम्हणो गुरु:"

 
ब्रम्हज्ञानाचा विचारू. 
त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.
वर्णानां  ब्राम्हणो गुरु:(14/7/30)

समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्‍या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते. 

महाभारतात युधिष्ठिर-सर्प संवाद आहे. नागाने युधिष्ठिराला विचारले, "ब्राह्मण कोण आहे?" युधिष्ठिर म्हणाले की ज्या व्यक्ति मध्ये सत्य, दान, क्षमा, अस्तेय,आणि दया इत्यादि सात्विक गुणांचा वास असतो. जो विद्वान तपस्वी असतो, तो ब्राम्हण". नाग म्हणाला की "शूद्रामध्येही हे गुण असू शकतात." युधिष्ठिर म्हणाले की “जर एखाद्या शूद्रा मध्ये वरील वैशिष्ट्ये असतील तो शूद्र, ब्राह्मण आणि ज्याच्यात हे गुण नाहीत तो ब्राम्हण ही शूद्र असतो.

आपल्या सनातन धर्मात अनेक मत आणि मतांतरे आहेत. अनेक देवी देवता आहेत. त्यांची पूजा उपासना आणि उत्सव करणारे सर्वच वर्णांचे पुजारी आहेत. अनेक मठ आणि महंत आहेत. भक्त त्यांना गुरु मानतात आणि ते भक्तांना उपदेश करतात. पण ते सर्वच ब्रम्हज्ञानी नसतात. अनेक फक्त महंत फक्त त्यांच्या गुरूंच्या चमत्कारांच्या गाथा सांगून भक्तांना भुलवितात. चमत्कारांच्या गाथा ऐकून भक्त ही सदा सर्वदा चिलमच्या नशेत राहणार्‍या ज्ञानहीन व्यक्तीला गुरुचा दर्जा देऊन त्यांच्या भक्तीत लीन होतात. अश्या चमत्कारी बाबांना गुरु मानणार्‍या भक्तांचा इहलोक आणि परलोक दोन्ही बिघडणारच. समर्थ म्हणतात "गुरुत्व नेले कुपात्री". गुरुच ब्रम्हज्ञानी  नसतील तर ते आपल्या भक्तांना सांसारिक आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा उपदेश करूच शकणार नाही. समर्थ म्हणतात अज्ञानी आणि नीच आचार-विचार असलेल्या महंतांची महंती वाढली की देश आणि धर्म दोघांचाही नाश होतो. देशात गरीबी अराजकता, हिंसेचे साम्राज्य पसरते. याचे प्रत्यक्ष उदाहरण पाकिस्तान इत्यादि देश आहेत. समर्थांच्या काळातही हीच परिस्थिति होती. असल्या मूर्ख गुरूंमुळे राज्यावर म्लेंछ आले, असे समर्थांचे मत होते.  

आपले सौभाग्य आज किमान आपला नेता तरी ब्रम्हज्ञानी आहे, त्यामुळे करोंना काळात ही आपल्या देशात कुणी उपाशी झोपले नाही किंवा ब्रिटेन अमेरिका सारख्या मोठ्या अर्थ व्यवस्थेला ही तडा गेला नाही. पण दुसरी कडे मेकाले शिक्षण पद्धतीत असलेल्या दोषांमुळे देशात ज्ञान, पुरुषार्थ आणि कर्तृत्व विहीन फक्त पुस्तकी ज्ञान असलेली एक मोठी युवा पिढी तैयार झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी देशाला ब्रम्हज्ञानी गुरूंची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज आहे. 


 


No comments:

Post a Comment