Saturday, March 4, 2023

रतिपाल: एक आत्मघातकी प्रवृती

रणथम्बौरचे राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपाल होता. दिल्ली सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने रणथम्बौर वर आक्रमण केले. अनेक महीने झाले तरी रणथम्बौर दुर्ग शरण आला नाही. अल्लाउद्दीनच्या सेनला रसदची टंचाई जाणवू लागली. त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला. जर आपली अशी परिस्थिति आहे तर दुर्गात परिस्थिति यापेक्षा ही बिकट असेल. काफिर चंद चांदीच्या तुकड्यांसाठी देशाची गद्दारी करतात. हीच योग्य वेळ आहे, आपण दगाबाज काफिरांचा वापर करू शकतो. अल्लाउद्दीने राजा हम्मीरदेवला शांति प्रस्ताव पाठविला. मंत्री रतिपाल शांतिवार्तेसाठी अल्लाउद्दीनच्या छावणीत आला. अल्लाउद्दीन रतिपालचे जंगी स्वागत केले. अल्लाउद्दीन त्याला म्हणाला आमचे युद्ध फक्त हम्मीरदेवशी आहे. इतर राजपूतांशी नाही. या युद्धात नाहक तुमचा बळी जाईल. तसेही रणथम्बौरवर शासन फक्त चौहान वंशीय राजपूतच करणार. तू आणि इतर वंशीय राजपूत उपेक्षित  चाकरच राहणार.  तू आमची मदत कर आम्ही तुला बूंदीचे राज्य देऊ. तू सार्वभौम राजा होईल.  मंत्री रतिपालला अल्लाउद्दीनचे म्हणणे पटले. स्वार्थात आंधळा झाल्यामुळे तो हे ही विसरला अल्लाउद्दीन खिळजीचा उद्देश्य  हिंदूंचा विनाश करून देशात इस्लामी राज्य स्थापित करणे आहे. रतिपालने दुर्गाच्या एका भागाची रक्षा करणार्‍या सेनापति रणमलला (काहींच्या मते हाही मंत्री होता) आपल्या षडयंत्रात शामिल केले. एका दिवशी भल्या पहाटे त्यांनी दुर्गाचा दरवाजा उघडला. अल्लाउद्दीनचे सैन्य रणथम्बौर दुर्गात शिरले. महाराणी रंगादेवी, पौत्री देवल देवी सहित 12000 राजपूत स्त्रियांनी जौहर केले. पुरुषांनी केसरिया करून आपल्या प्राणांची आहुति दिलीअल्लाउद्दीनने बक्षीस म्हणून  मंत्री  रतिपाल आणि रणमलचे डोके हतीच्या पायाखाली चिरडन्याचा आदेश दिला. अल्लाउद्दीन त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या राजाचे आणि राज्याचे झाले नाही तर आमचे काय होणार.तुमच्यासारख्या फितुरांसाठी हेच इनाम उचित आहे. रणथम्बौर महास्मशानात बदलले. आज तिथे फक्त वन्य प्राणी विचरण करतात.  

आज ही आपण भारतीय याच आत्मघातकी प्रवृतीने ग्रस्त आहोत. आमच्या समाजाची उपेक्षा होते, आम्हाला वतन (आमदारकी खासदारकी) पाहिजे. नाही मिळाले तर आम्हाला नष्ट करण्याच्या मनसुबा रचणार्‍या शत्रूशी ही आम्ही हात मिळवू. मग आम्ही नष्ट झालो तरी चालेल. महाराष्ट्राचे म्हणाल तर फक्त वतन साठी स्वकीय नातेवाईकने छत्रपति संभाजी महाराजांना दगा दिला होता, हा इतिहास आहे. परिणाम, स्वराज्यासाठी लाखो मराठी वीरांना प्राणांची आहुति द्यावी लागली. 


No comments:

Post a Comment