Tuesday, March 7, 2023

वार्तालाप: (5) मनातील विचार सकारात्मक आणि नकारात्मक

 

समुद्रात जेवढा लाटा उसळत नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार तरंगा मानवाच्या  मनात सदैव उसळी भरत राहतात.  सृष्टी कर्त्याच्या मनात विचार आला आणि या ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी म्हणतात 'जे काही ब्रम्हांडात आहे ते पिंडामध्येही' आहे. प्रत्येक सूष्म कोशाचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. एका कोशातील विचार ही ब्रम्हांडाची निर्मिती करण्यास समर्थ आहे. विचारांनी स्मृती निर्मित होते आणि कोशांच्या स्मृति ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून सतत वृद्धिंगत होत राहतात आणि त्यानुसार जीवांची निर्मिती करतात. मानवाची निर्मितीही कोशांतील स्मृति अनुसारच झाली आहे. आपल्या शरीरातील कोश ही सतत निर्मितीत व्यस्त राहतात, शरीरात होणारी क्षती सतत दूर करत राहतात. मनुष्य आपल्या विचारांच्या स्मृती पुढच्या पिढीलाही प्रदान करतो. मानवाचे आचार व्यवहार - धर्म, अर्थ, काम जीवन सर्वच विचारानुसार ठरते आणि भविष्यासाठी स्मृतीत सुरक्षित होते. सकारात्मक विचार सकारात्मक स्मृति निर्माण करतात. मानवाला शारीरिक आणि मानसिक रूपेण निरोगी ठेवतात. नकारात्मक विचार नकारात्मक स्मृति निर्मित करतात. या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरातील कोशिका भ्रमित होतात, निर्मितीच्या जागी शरीरलाच नष्ट करू लागतात. अधिकान्श आजारांचे हेच मुख्य कारण आहे. मानवाला होणारे आनुवंशिक आजारांचे मुख्य कारण ही नकारात्मक विचार आहे. आत्महत्येचे मुख्य कारण ही हेच आहे. 

मानव जातीचे अस्तित्व विचारांवर निर्भर आहे. सकारात्मक विचार ब्रम्हदेवाने निर्मित केलेल्या सृष्टीच्या समस्त जीवांचा जगण्याच्या अधिकाराचे सम्मान करतात. जियो और जीने दो या सिद्धांताचे पालन करतात. पण मानव जातीचे नकारात्मक विचार पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व ही संपवू शकतात.  तूर्त सकारात्मक विचार करा. आनंदी रहा. आनंदी आणि निर्मितीत व्यस्त राहणाऱ्या कोशिका जीवनाची रक्षा करण्यास समर्थ आहेत. करोना काळात हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. 



 

No comments:

Post a Comment