श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:
स्वयें आत्महत्या करणे
तो तमोगुणl (2.6.10)
तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जगणे असंभव वाटून निराश झालेला व्यक्ति आत्महत्या करतो. भारतात पाउणे दोन लाख लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यात 80 टक्के साक्षर असतात. 15 ते 40 वय गटात सर्वात जास्त लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा निर्णय करणार्याचा असला तरीही काही आत्महत्या करणारे दुसर्यांवर दोष लावतात. मी मरणार पण दुसर्यालाही ही शांतिने जगू देणार नाही ही तमोगुणी वृती. आत्महत्येचे प्रमुख कारण प्रपंचात अयशस्वी होणे अर्थात घरातील कटकटी, शिक्षण, प्रेम भंग, रोजगार, अहंकारला ठेस लागणे इत्यादि इत्यादि. माझ्या दृष्टीने खरे कारण काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे, दिवस रात्र नकारात्मक विचार करत राहणे इत्यादीं तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत म्हणायचे तर डिप्रेशन मध्ये जातो आणि आत्महत्या करतो. त्यात सोशल आणि दृश्य मीडियात अपराध आणि आत्महत्येचे महिमा मंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजित करते. तरुणांच्या आत्महत्येचे एक कारण शैक्षणिक संस्थामध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा. तरुणाला वाटू लागते आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्याच्या सारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ति त्यात नाही त्यापेक्षा मरणे बेहतर. अश्या नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला सारखे शिक्षित ही आत्महत्या करतात. असो.
No comments:
Post a Comment