द्वाविमौ वातौ वात आ सिन्धोरा परावत: ।
दक्षं ते अन्य आ वातु परान्यो वातु यद्रप: ॥ (ऋ.१३७.१०.२.)
आ वात वाहि भेषजं वि वात वाहि यद्रप:।
त्वं हि विश्वभेषजो देवानां दूत ईयसे ॥ (ऋ १३७.१०.३)
ऋग्वेदात प्राणाला औषधी म्हंटले आहे. प्राणरूपी वायु श्वासाच्या रूपात हृदयात प्रवेश करून जीवनदायनी शक्ति वाढविते आणि प्रश्वासरूपी वायु रोगांना शरीरातून बाहेर काढते. वायु ही देवतांची औषधीरूपी दूत आहे. नियमित प्राणायाम केल्याने शरीरातील क्षतिग्रस्त कोशिका ही पुनर्जीवित होतात. माणसाला नवजीवन मिळते. अधिकान्श रोगांपासून सहज मुक्ति मिळते.
याचेच एक उदाहरण. २६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तनी आयएसआय प्रायोजित आतंकी हल्ला झाला. ताज हॉटेल वर ही हा हल्ला झाला होता. त्यावेळी मरीन कमांडो प्रवीण तेवतियांनी ३ दशहतवाद्यांना कंठस्नान घातले आणि ताज हॉटेलमध्ये असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडानी आणि चार सांसद सहित १५०हून जास्त लोकांचे प्राण वाचविले. पण लोकांना वाचविताना प्रवीण तेवतियाला पाच गोळ्या लागल्या. त्यांची फुफ्फुसे निकामी झाली. सरकारने शौर्यचक्र देऊन प्रवीणचा सम्मान केले.
गेल्या 26 नोव्हेंबर 2022ला सकाळी आस्था चॅनल लावले होते. कमांडो प्रवीण तेवतिया बाबा रामदेव सोबत मंचावर बसले होते. प्रवीण तेवतियांच्या शब्दांत - हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देण्यात ते यशस्वी ठरले. पण क्षतिग्रस्त फुफ्फुस्सांमुळे त्यांना 25 पावले ही चालणे शक्य होत नव्हते. डॉक्टरांचे मत होते आता भविष्यात त्यांना धावणे आणि पोहणे शक्य नाही. अश्या वेळी रोज सकाळी पाच वाजता उठून स्वामी रामदेव यांना आस्था वर पाहून योग आणि प्राणायाम सुरू केले. काही मिंनिटांपासून सुरू करून ते रोज चार-चार तास प्राणायाम करू लागले. परिणाम त्यांनी 2012 पुन्हा धावणे सुरू केले. 2015 पहिल्यांदा मुंबईत अर्ध मेराथन पूर्ण केली. नंतर पूर्ण मेराथन ही पूर्ण केली. 2017मध्ये प्रवीण तेवतिया निवृत झाले. 2018 मध्ये प्रवीणने दक्षिण आफ्रिकेत आयरनमेन प्रतियोगिता पूर्ण केली ज्यात 3.86 किमी समुद्रात पोहणे, 180 किमी सायकल चालविणे आणि 42 किमी धावणे असते. आज ही ते रोज 1 एक तास प्राणायाम, एक तास इतर व्यायाम करतात आणि दहा किमी धावतात. हाच किस्सा पाहताना मला ऋग्वेदातील वरील ऋचांचे स्मरण झाले. प्राणायाम रूपी औषधी आपल्याला निशुल्क उपलब्ध आहे तरीही आपला त्यावर विश्वास नाही, हेच दुर्दैव. सहज मनात विचार आला, अनंत अंबानी यांनी स्टओराइड घेण्या एवजी प्राणायाम केले असते तर त्यांचे वजन पुन्हा वाढले नसते. असो.
No comments:
Post a Comment