Monday, January 16, 2023

वार्तालाप :(2) जीभ आणि सर्वनाश

जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे.  जीभ नसेल तर आपल्याला जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात: 

जनासीं मीत्री करीना।

ठिण शब्द बोले नाना।

मूर्खपणें आवरेना।

कोणीयेकासी॥ 19/3/१३॥

याचेच एक उदाहरण - महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते. या आयोजनाचा एक उद्देश्य कौरवांशी मैत्री संबंध्द दृढ करणे ही होता. पण झाले काय मय दानवाने बांधलेल्या मायावी महालात दुर्योधन सहित सर्व कौरव पाण्यात पडतात. त्यांना असे पाण्यात पडताना पाहत द्रोपदी त्यांचा उपहास करत आपल्या सखींना म्हणाली पहा "आंधळ्याचे पुत्र आंधळे" कसे सर्व पाण्यात पडले हा! हा! हा!". जिभेचा हा वार दुर्योधनाला जिव्हारी लागला. त्याच क्षणी त्याने पांडवांचा सर्वनाश करण्याचा प्रण केला. पांडवांच्या सर्वनाशासाठी त्याने नाना षड्यंत्र केले. परिणाम, महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरुवंशाचा संहार झाला. जर द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो  कुणालाही तो कितीही दीनहीन किंवा मूर्ख का असेना, जिभेने कधीच चुकूनही कटू वचन बोलले नाही पाहिजे.  

No comments:

Post a Comment