Tuesday, January 10, 2023

वार्तालाप : (1) श्रवण


जे जे उत्तम ऐकले
ते ते उत्तम आचरले  
म्हणजे श्रवण.


प्रपंच आणि परमार्थात सफल होण्यासाठी आपण श्रवण करतो. विद्यार्थी अवस्थेत गुरुजनांचे श्रवण केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. नौकरी व्यवसायात सफल होण्यासाठी त्या क्षेत्रांतील विद्वानांना श्रवण केले पाहिजे. सद्गुरूंचे श्रवण केल्याने पारमार्थिक ज्ञानाची प्राप्ती होते. मुमुक्षू साधक  वेद, उपनिषद, भागवत कथा, ज्ञानेश्वरी  सारख्या पारमार्थिक ग्रंथांचे  श्रवण करतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात असे केल्याने भक्ति प्राप्त होते, आसक्ती तुटते, चित्ताची शुद्धी  होते, मी पणा नष्ट होतो, आशंका फिटतात आणि संशय दूर होतात. पूर्वीचे दोष पालटतात, कुसंगती तुटते, संसारीक आणि आध्यात्मिक कार्य सिद्ध करण्याचा निश्चय दृढ होतो. दोन शब्दांत श्रवण केलेले ज्ञान, अखंड पुरुषार्थ करून आचरणात आणले तर संसारीक आणि आध्यात्मिक कार्य सिद्ध होतात.  

No comments:

Post a Comment