गेल्या युगात मानव नावाचा अत्यंत बुद्धिमान असा प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता.
कठोर तप करून त्याने अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या.
त्या सिद्धींचा जोरावर तो आकंठ भौतिक सुखात बुडालेला होता.
पृथ्वीवरच्या इतर जीवांची त्याला यत्किंचित हि पर्वा नव्हती.
पण या वरही त्याचे समाधान झाले नाही.
अजर-अमर होण्यासाठी त्याने पुन्हा कठोर तप सुरु केले.
अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले.
मनुजपुत्र तुझ्या कठोर तपस्येने मी प्रसन्न झालो आहे,
काय पाहिजे तुला मागून घे,
अमरतेचे वरदान सोडून.
पण वर मागण्याआधी विचार कर. अहंकारने ग्रस्त मनुजपुत्र म्हणाला,
मी काही राक्षसांच्या सारखा मूर्ख नाही.
तुम्ही निर्मित केलेले भूचर,
जलचर, नभचर,
देव आणि दानव यांपैकी कोणताही जीव माझा वध करू शकणार नाही.
पण मी ज्याच्यावर हात ठेवेल तो तक्षणी मरणार,
असा वर द्या.
ब्रह्मदेवाने तथास्तु म्हंटले,
आणि ते अदृश्य झाले.
आता मी सर्व शक्तिमान,
माझ्या शक्ती समोर देव,
दानव सर्व
तुच्छ. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. अहंकाराने ग्रस्त मनुजपुत्राची बुद्धी विपरीत झाली. त्याने सर्वप्रथम,
प्राण्यांवर हात ठेवला.
पृथ्वीवरील सर्व जीव-जंतू विलुप्त झाले.
मग मानवाने झाडांवर हात ठेवला.
सर्व वनस्पती नष्ट झाली.
तहान लागली म्हणून मानवाने पाण्यात हात घातले,
पाणी मृत आणी विषाक्त झाले.
वायूचा स्पर्श मानवालाच्या हाताला जाणविला.
माणसाचा हाताचा स्पर्श होताच,
वायुतून प्राणवायू निघून गेली. भूक, तहान आणि प्राणवायूच्या अभावाने,
तडफडून-तडफडून कलयुगात मानवाचा दारूण अंत झाला.
No comments:
Post a Comment