रात्री मूग आणि मोठ भिजायला टाकले होते. सकाळी कपड्यात बांधून ठेवले. वातावरण ढगाळ व थोडे थंड असल्यामुळे संध्याकाळ पर्यंत जास्ती अंकुरण झाले नव्हते. मोड थोडी बहुत आली होती. संध्याकाळचे ५ वाजले होते. बाहेर पाऊस सुरु होता. अश्यावेळी चटक-मटक खाण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. घरात आम्ही दोघेच होते. मी सहज सौ.ला म्हणालो भूक लागली आहे, पटकन काही चटक-मटक खायला करून देते का? सौ.ने विचारले, मुगाचे आणि मोठ्चे धिरडे चालतील का पटकन हेच बनविता येतील? मी हो म्हणालो.
साहित्य: एक एक वाटी मूग आणि मोठ, शिवाय २ मोठे तांदुळाची पिठी , हिरव्या मिरच्या ३-४, लसून ४-५ पाकळ्या, हळद १/२ चमचे, तिखट १-२ छोटे चमचे (स्वादानुसार), धने पूड १ मोठा चमचा, जिरे पूड १ छोटा चमचा आणि मीठ चवीनुसार. तेल आवश्यकतानुसार
कृती: मिक्सरमध्ये मोठ, मूग, हिरवीमिरची, आले लसून टाकून आणि अर्धीवाटी पाणी घालून पेस्ट तैयार करून घ्या. एका भांड्यात पेस्ट टाकून त्यात हळद, तिखट, धने आणि जिरे पूड आणि मीठ घालून फेटून घ्या.
गॅस लाऊन त्यावर तवा ठेवा. तवा थोडा गरम झाल्यावर चमच्याने त्यावर थोडे तेल पसरवून मग एका मोठ्या चमच्याने मिश्रण तव्यावर पसरवून, दोन्ही बाजूनी धिरडे व्यवस्थित भाजून घ्या.
टमाटरची चटणी: आपण नेहमीच धिरडे, चटणी किंवा टमाटरच्या सॉस सोबत खातो. पण पावसाळ्यात कोथिंबीर सहज मिळत नसते. घरात टमाटर होते. २-३ मध्यम आकाराचे टमाटरची मिक्सरमध्ये पेस्ट केली. एक लहान कढई गॅसवर ठेवली, १ मोठा चमचा तेल टाकले, अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर त्यात १ चमचे तिखट टाकले. नंतर टमाटर पेस्ट टाकून एक उकळी येऊ दिली. नंतर एक लहान तुकडा गुळाचा टाकला आणि थोडे मीठ त्यात घातले. दोन एक मिनिटांनी गॅस बंद केला. ४-५ मिनिटात टमाटर सॉसचा स्वादिष्ट विकल्प तैयार झाला.
केवळ १५ मिनिटात दोन्ही वस्तू तैयार झाल्या. रिमझिम पाउस आणि सौ. सोबत धिरडे खाण्याची मजा काही औरच. नंतर गरम-गरम चहा हि मिळाला.
No comments:
Post a Comment