गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?
फारेनला आहे आजकल.
कुठे दुबई ला?
आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब, कनाडात सेटल झाला आहे.
काय करतो तिथे?
"मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम-टू-टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पुण्या-मुंबईपेक्षा ही बेस्ट आहे".
अस होय, मग लग्न वैगरेह झाल असेल त्याच?
"छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच, आता साहेब तुम्हीच सांग, तिथे जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार?"
आ!!!
No comments:
Post a Comment