Sunday, July 19, 2015

स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा


सिंहासनावर विराजमान महाराज विक्रमाचे डोके भडकलेले होते. आज सकाळी त्यांनी सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला.  नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला. आता असे  चालणार नाही. काही ही करा  मला पुन्हा कधी नगरीत घाण  दिसता कामा नये. पण एक लक्षात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे. प्रधानमंत्री म्हणाले असेच होईल महाराज.

दुसर्या दिवशी प्रधानमंत्रीनी, महाराजांसमोर एक चष्मा  पेश केला आणि  म्हणाले महाराज हा चष्मा खास इंद्रप्रस्थ नगरीतून महाराज युधिष्ठिर यांनी पाठविला आहे. हा चष्मा घातल्यावर तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही किंवा घाणीचा वास ही येणार नाही. 

महाराज विक्रमादित्यांनी चष्मा डोळ्यांवर चढविला. अवंती नगरीत फेरफटका मारला. त्यांना कुठे ही घाण दिसली नाही किंवा घाणीचा  वास ही आला नाही. महाराज प्रसन्न झाले.  

स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला या कथेचा अर्थ समजेल, त्याचे घर नेहमीच स्वच्छ राहील.


1 comment:

  1. व्वा, खूपच छान कथा. रूपक खरंच विचार करायला लावणारं आहे. तुमच्या लेखनाची कमी शब्दात मोठा आशय सांगण्याची पद्धत विलक्षण आहे.

    ReplyDelete