भल्या पहाटे आयुष्याला कंटाळून तो त्या डोंगराच्या कड्यावर पोहचला. इथून उडी मारली तर आपण नक्की मरणार ना, याची खात्री करण्यासाठी त्याने कड्या खाली डोकावून पाहिले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खाली दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावत होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यन्त दगडांना जखडून ठेवले होते. पिपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना झुगारून मस्त वार्या सावे डोलत होते. त्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, इथे न माती, न पानी, फक्त दगडाची एक भेग, तरीही हे झाड जिवंत आहे. झाडाला आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरीही पिंपळाने तक्रार केली नाही. दगडातच त्याने जगण्याचा मार्ग शोधला. आपण ही परिस्थिति बदलू शकतो. पूर्व दिशेला सोनेरी करणे उधळत सूर्य उगवला होता. त्याने विचार बदलला. तो पुन्हा आपल्या घरी परतला. नव्याने जगण्याचा संघर्ष सुरू करण्यासाठी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...
-
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्र...
No comments:
Post a Comment