या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ. सकाळी उठून ब्रेकफास्टची तैयारी करते, मा की दाल, राजमा, छोले किंवा भाजी इत्यादिला फोडणी देते आणि कणीक मळून ठेवते. त्या नंतर सौ. चहा करते. सून ही सहाच्या आधी उठते. चहा पिऊन, पराठे, पोळ्या इत्यादि करते. नंतर आंघोळ करून, तैयार होऊन, नाश्ता करून, धावत-पळत आठच्या आधी घरातून निघते. संध्याकाळी सून साडे सात पर्यन्त घरी परतते. त्या आधी सौ. स्वैपाकाची कच्ची तैयारी करून ठेवते. सौ.च्या हातचा चहा पिऊन, सून स्वैपाकाचे काम बघते. त्यामुळे न मागता, मला ही संध्याकाळचा दुसरा चहा मिळतोच. ऑफिस मधून घरी यायला मुलाला ही रात्रीचे 9 वाजतात. रात्री साडे नऊ नंतर जेवण. मग सर्व आटोपता-आटोपता रात्रीचे साडे दहा-अकरा रोजच होतात. दुसर्या शब्दांत म्हणा, लेक आणि सून दोघांचे एका रीतीने यंत्रवत जगणे सुरू झाले आहे. महानगरात जगण्याचा संघर्ष हा यंत्रासारखाच असतो.
एक दिवस संध्याकाळी सात वाजता मित्रांसोबत पार्क पे चर्चा करून घरी परतलो. पाहतो काय सौ.ने भाजीला फोडणी टाकलेली होती आणि पोळ्या करत होती. मी आश्चर्याने तिच्या कडे पाहिले. सौ. म्हणाली सून थकून घरी येते, म्हंटले आज संध्याकाळचा स्वैपाक करून टाकते. मला आपल्या कानांवर विश्वास झाला नाही. मी म्हंटले, खरे सांग, तुला सुनेचा एवढा पुळका काहून आला. सौ. माझ्या कडे पाहत हसत म्हणाली, तुमचा लेकरू आज सकाळी ऑफिस जाताना सुनेला म्हणत होता, आज त्याने साबण लाऊन आंघोळ केली आहे. सौ.चे शब्द कानात पडले आणि मी भूतकाळात पोहचलो.
मुले शाळेत जाऊ लागली होती. मुलांची शाळा सकाळची होती. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्शा सकाळी पाउणे सातला यायचा. मला ही सकाळी सातला घरातून निघावे लागायचे. त्याचे कारण बसस्टॉप घरापासून एक किमी दूर होता. या शिवाय त्यावेळी दिल्लीत मेट्रो सुरू झाली नव्हती. बस ने कमीत-कमी दीड तास कार्यालयात पोहचायला लागत असे. आम्ही दोघ सकाळी पाचला उठायचो. चहा पिऊन सौ. सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि तिघांचे डब्बे तैयार करायची. मुलांसाठी सौ.ला दुपारी ही स्वैपाक करावेच लागायचा. या शिवाय घराची साफ-सफाई, कपडे धुणे, भांडे घासणे सर्वच सौ.ला करावे लागायचे. आता किमान झाडू-पोंछा आणि भांडे घासण्यासाठी बाई आहे. मला रोज संध्याकाळी घरी यायला रात्रीचे नऊ किंवा साडे नऊ होत असे. मुले ही रात्री दहा-साडेदहा पर्यन्त अभ्यास करायाची. रोजचे रुटीन आटोपता-आटोपता रात्रीचे 11 व्हायचेच. दिवसभराच्या कामाने सौ. थकून जायची. भारत सरकारात पीएसची नौकरी, त्यात मोठ्या कार्यालयात मोठ्या अधिकार्यांसोबत, असल्याने शनिवार आणि रविवारची सुट्टी क्वचित मिळायची. अश्या बिकट परिसस्थितीत रात्रीच्या नाटकाचा चौथा अंक सुरू करणे जमत नव्हते. शेवटी यावर उपाय काढला. ज्या दिवशी इच्छा अनावर होत असे, सकाळीच आंघोळ झाल्यावर सौ.ला म्हणायचो, आज साबणाने आंघोळ केली आहे. सौ. दिवसाचे काम त्या हिशोबने आटपायची. त्या दिवशी संध्याकाळी बहुधा वरण भात किंवा खिचडी इत्यादि करायची. त्यात वेळ आणि मेहनत कमी लागते. रात्री साडे नऊ होताच, सौ. मुलांवर तोफ डागायची, तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा नसतो. रात्री पुस्तके उघडून बसता आणि सकाळी उठताना नखरे करतात. मी दिवा बंद करते आहे, निमूट पणे जाऊन झोपा आणि सकाळी वेळेवर उठा. मुले झोपली तरच आमचा नाटकाचा चौथा अंक सुरू व्हायचा.
काही क्षणात मी भानावर आलो, च्यायला, आपला परवलीचा शब्द मुलांना माहीत आहे. आज तोच शब्द लेकराने वापरला. याचा अर्थ आपले गुपित सुनेला ही माहीत झाले असेल. मी हसत सौ.ला म्हणालो, अब पोल तो खुल चुकी है, आज अपुन भी सोने से पहले साबण लगाकर आंघोळ करेगा. तुमच्या जिभेला काही हाड...... काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते.
Great article! For more information on job opportunities, check out Naukri Kendra.
ReplyDelete