महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते. याचा परिणाम दोन्ही वेळा लोकसभेत सात ही जागा भाजप ने जिंकल्या. ज्या राज्यांत अल्पसंख्यक मतदाता 10 टक्के पेक्षा जास्त आहेत त्या राज्यांत जास्त मतदानाचा फायदा भाजपला होतो. दिल्लीत जर आगामी विधान सभा निवडणूकीत जर महाराष्ट्र प्रमाणे 66 टक्के मतदान झाले तर भाजप दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकू शकते. निष्कर्ष एकच -महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत अर्धा टक्के मतांचा परिणाम एनडीएला लोक सभेत भोगावा लागला होता. विधानसभेत मतदान 5 टक्के जास्त झाल्याने महाराष्ट्रात त्सुनामी येणारच होती.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 2019 पेक्षा 5 लाख मते जास्त पडली होती. महा विकास आघाडीला (राऊंड फिगर) 2.50 कोटी मते मिळाली होती तर महायुतीला 2.48 कोटी मते मिळाली होती. मतांचे अंतर 2 लक्षपेक्षा कमी होते. भाजपला 2019च्या लोकसभा निवडणूकीत 1.49 कोटी मते मिळाली होती जवळपास तेवढीच मते 2024 लोकसभा निवडणूकीत मिळाली होती. भाजपा लोकसभेच्या निवडणूक निकालात विधानसभेच्या 83 जागांवर पुढे होती. शिंदे सेनेला 73.77 लक्ष मते मिळाली आणि ती विधानसभेच्या 38 जागांवर पुढे होती. अजित दादांच्या एनसीपीला 20.53 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 6 जागांवर पुढे होती. महायुती विधानसभेच्या 128 जागांवर पुढे होती. अर्थात फक्त बहुमतापेक्षा 17 जागा कमी होत्या.
कॉंग्रेसला लोकसभेत 96.40 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 63 जागांवर पुढे होती. शरद पवारच्या एनसीपीला 58.50 लक्ष मते मिळाली ती विधानसभेच्या 32 जागांवर पुढे होती. ठाकरे सेनेला 95.23 लक्ष मते मिळाली होती. ती 56 जागांवर पुढे होती. अर्थात लोकसभा निवडणूकेनुसार विधानसभेत 151 जागांवर महा विकास आघाडी पुढे होती. बहुमत पेक्षा फक्त 7 जागा जास्त.
विधानसभा निवडणूकीत भाजपला 1.73 कोटी अर्थात 24 लक्ष मते जास्त मिळाली. शिंदे सेनेला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा जवळपास 6 लक्ष जास्त मते मिळाली. इथे मजेदार बाब अशी की शरद पवारांच्या एनसीपीला ही जवळपास 73 लक्ष मते मिळाली. तिला लोकसभेपेक्षा जवळपास 14 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ कांग्रेस आणि उद्धव सेनेच्या अधिकान्श समर्थकांची मते शरद पवारांच्या एनसीपीला मिळाली. अजित पवारांना 58 लक्ष मते अर्थात तब्बल 38 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ भाजप आणि शिंदे समर्थकांनी आपली 100 टक्के मते दादांच्या कडे वळवली. भाजप मतदार पक्षा प्रति किती एकनिष्ठ आहेत, याची कल्पना येते. दादा आणि शरद पवारांना मिळालेल्या मतांच्या आधारावर माझा निष्कर्ष - बहुतेक दादांच्या मतांमध्ये 50-60 टक्के मते भाजप आणि शिंदे समर्थकांची असण्याची शक्यता जास्त. युतीत राहणे दादांना जास्त फायद्याचे आहे.
मग मते कुणाला कमी मिळाली, हा प्रश्न समोर येणारच. कॉंग्रेस पक्षाला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा 16.40 लक्ष मते कमी मिळाली. उद्धव सेनेला 64.43 मते मिळाली, लोकसभेपेक्षा तब्बल 30 लक्ष मते कमी मिळाली.
उद्धव सेनेला विधानसभा निवडणूकीत लोकसभेपेक्षा 30 लक्ष मते कमी मिळाली. लोकसभा निवडणूकीच्या वेळी उद्धवला शिवसैनिकांची सहानभूती मिळाली. अधिकान्श शिवसैनिकांना वाटत होते, भाजपला धडा शिकवून, उद्धव पुन्हा भाजप सोबत युती करतील. लोकसभेत भाजपला पाठिंबा देतील. पण असे काही घडले नाही. आपल्या सैनिकांच्या मनात काय आहे, हे उद्धवला कळले नाही. अधिकान्श हिंदुत्ववादी शिवसैनिक निराश झाले. विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या बाजूने मतदान केले. कॉंग्रेस आणि अल्पसंख्यक मतांची साथ मिळाली नसती तर शिवसेनेचे 5 आमदार ही निवडून आले नसते.
कांग्रेस भाजप विरुद्ध 74 जागांवर लढत होती. त्यातल्या फक्त दहा जागा कांग्रेस ने जिंकल्या. याचा एकच अर्थ होतो,अधिकान्श जागांवर उद्धव सेनेच्या समर्थकांची मते काँग्रेसला मिळाली नाही. त्यांनी पूर्वी प्रमाणे भाजपला मतदान केले. माझा निष्कर्ष- महाराष्ट्रात कांग्रेसने पुढे स्वबळावर निवडणूक लढवावी. उद्धव सेनेसोबत युती करण्याचा काहीही फायदा कांग्रेसला मिळणार नाही.
या वेळी मतदान जास्त होण्याचे कारण मौलवींचे फतवे, त्यांच्या 25 कलमी मागणीवर कांग्रेसचा सकारात्म्क प्रतिसाद. याशिवाय बंगलादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते मौन राहिले. योगींच्या "एक रहा, सेफ रहा" चा प्रभाव ही मतदारांवर पडला. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात एक गठ्ठा मतदान केले. यावेळी शिक्षित मतदारांनी ही मतदानात भाग घेतला. माझ्या अनेक पुणेकरी मित्रांनी प्रथमच मतदान केले.
महाराष्ट्राचा हा निकाल अनेपक्षित नव्हता, हा निष्कर्ष आकड्यांवरून सहज काढता येतो.
Great article! For more information on job opportunities, check out Naukri Kendra.
ReplyDelete