गेल्या शनिवारी सकाळी सौ. माहेरी गेली. आता घरात मुलगा, सून आणि मी. सौ. नसताना अस्मादिकांना खाण्याचे नवीन प्रयोग करायला स्वैपाकघर मोकळे होते. माझी सून म्हणाली बाबा आपण रविवारी ब्रेकफास्ट साठी डोमिनो मधून पित्झा मागवू. मी उत्तर दिले, बाजारातून महागडा पित्झा मागविण्यापेक्षा स्वैपाक घरात ओवन आहे घरीच पित्झा बनवू. ओवनचा काही उपयोग तरी होईल. या शिवाय विदेशी कंपनीचा पित्झा मागवून आपल्या देशाचे नुकसान कशाला करायचे. आमच्या लेकाने माझ्या मताशी सहमति दाखविली. बाजारात जाऊन चार पित्झा बेस (त्यावर दोन फुकट मिळाले), अमूलचे ग्रेटेड चीज आणि पनीर, शिमला मिरची, बेबी कॉर्न आणले. घरात स्वदेशी कंपनीचा चिली सौस आणि टमाटो सौस आणि पित्झा वर टाकण्यासाठी हर्ब ही होते (फोटू टाकला आहे). पित्झावर भपुर सौस पसरवावे लागते म्हणून तो ही तैयार करण्याचा विचार केला. एक किलो लाल भडक हायब्रिड टमाटो शनि बाजारातून विकत आणले. रविवारी सकाळी चहा पिताना चार टमाटो, दोन हिरव्या मिरच्या, सहा सात काळी मिरी, एक छोटा अदरकचा तुकडा इत्यादि साहित्य एका भांड्यात घालून अर्धा वाटी पाणी टाकून उकळून घेतले. थंड झाल्यावर टमाटोचे साल काढून सर्व साहित्य त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सित ग्राइंड करून टमाटो प्यूरी बनवून घेतली. प्यूरी थोडी पातळ वाटली म्हणून गॅस वर थोडी गाढी करून घेतली.
पित्झा बाजार सारखा बनविण्याची एक ट्रिक आहे. माइक्रो ओवन खालून जास्त हिट देत नाही. त्या मुळे पित्जा बाजार सारखा करारा बनत नाही. आधी ओवन 200 डिग्री वर प्री हिट करून घ्यावे. नंतर पित्झा घेऊन खालच्या बाजूने तीन मिनिटे कन्वेंशन मोड वर शेकून घ्यावे. यामुळे पित्झाची खालची बाजू थोडी करारी होते. आता तो पित्झा घेऊन वरच्या बाजूला घरात बनविलेला भरपूर टमाटो पसरवून घेतला. त्या नंतर पनीर, कांदे, टमाटो, बारीक कापलेले बींस, बेबी कॉर्न, पनीर आणि शेवटी ग्रेटेड चीज पित्झा वर पसरविले. नंतर चिली सौस आणि बाजारातील विकत घेतलेले टमाटो सौस पित्झा वर शिंपडले. आता पित्झा ओवन मध्ये स्टँड वर ठेऊन 20 मिनिट कन्वेंशन मोड वर शेकून घेतला. अश्यारीतीने बाजार सारखा करारा पित्जा तैयार झाला. त्यावर हर्ब टाकून गर्मा-गर्म पित्झाचे तीन हिस्से करुन लगेच खायला घेतले. चार पित्झे आम्ही तिघांनी तासाभरात फस्त केले. पित्झाचे फोटू काढून सौ.ला व्हाट्सअप वर पाठविले. तिची प्रतिक्रिया इथे देणे उचित नाही. पण मजा आली. दोन पित्झा उरले होते. दुसर्या दिवशी पनीर आणि शिमला मिरी नव्हती. पण भरपूर चीज आणि टमाटो कांदा स्वीट कॉर्न टाकून पुन्हा पित्झा नाश्ता केला. पहिला फोटो दुसर्या दिवशीचा आहे.
No comments:
Post a Comment