Friday, August 16, 2019

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची कार्यशैली - रिकाम्या जागेचे (स्पेस) महत्व

(मी सन १९९७ ते मार्च २०१५ पर्यंत पंतप्रधान कार्यालयात कार्य केले आहे. त्या अनुभावावावर आधारित)

समजा तुम्ही एका कागदावर १० ओळी टंकल्या. सर्व वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने ठीक आहेत. पूर्ण विराम स्वल्प विराम ही योग्य जागी आहे. अर्थात १०० टक्के बरोबर.  तरीही  किमान ३-४ ठिकाणी शब्दांच्या मध्ये  रिकामी जागा जास्त (एकाच्या जागी दोन स्पेस) असण्याची शक्यता असतेच. ह्या सुद्धा चुकाच, ज्या सामान्य वाचकांना दिसणार नाही. प्रधानमंत्री मोदीजींच्या नजरेतून हि रिकामी जागा (स्पेस) ही सुटत नाही.   

साउथ ब्लॉक मध्ये एक मोठा हाॅॅल जिथे ६ अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत स्टाफ बसायचा. माझा केबिन हि तिथेच होता. २०१४ची निवडणूक संपन्न झाली मोदीजी प्रथमच प्रधानमंत्री झाले. पहिल्याच आठवड्यात सकाळी अनेपक्षितपणे कुठल्याही पूर्वसूचना न देता प्रधानमंत्री दरवाजा उघडून हाल मध्ये आले. माझा केबिन सर्वात आधी होता. उभे राहून मोदीजींना अभिवादन केले. प्रथम त्यांनी  माझे नाव विचारले. नंतर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. कुठल्या अधिकारी सोबत, कामाची प्रकृती काय, त्यात येणाऱ्या समस्या, कोणकोणत्या अधिकार्यांचा व्यक्तिगत स्टाफ इथे बसतो, त्यांचे कार्य काय, इत्यादी. आपल्या परीने सर्व प्रश्नांचे उत्तर दिले. त्यानंतर मोदीजींनी एक-एक करून सर्वांना भेटले व त्यांच्या कार्यांंची माहिती घेतली. नंतर सर्वांना "अकबर बिरबलची" गोष्ट हि सांगितली. त्या गोष्टीचा सारांश  "मी अकबर बादशाह नाही. तुम्ही काम करा पण बीरबल बनण्याचा प्रयत्न करू नका".  पुढील एका आठवड्यात पंतप्रधान, प्रधानमंत्री कार्यालयातल्या सर्वच विभागात गेले व तेथील चतुर्थश्रेणी कर्मचारी, लिपिक पासून ते अनुभाग अधिकारी सर्वांशी त्यांच्या कार्यासबंधी चर्चा केल्या. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. 

तसे पाहता मोदीजी १२ वर्ष गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना सचीवालयीन कामाची इत्यंभूत माहित होतीच. प्रधानमंत्री कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांना कामाबाबतीत ब्रीफहि केले असेल. तरीही त्यांनी  प्रत्यक्ष कार्य करणार्या निम्नश्रेणीच्या कर्मचार्यांकडून हि कामाची माहिती घेतली.  

पंतप्रधान कुठली हि जनकल्याणाची योजना साकारताना पहिले त्या योजनेची सर्वस्तरांहून इत्यंभूत माहिती घेतात. योजनेच्या कार्यान्वयन करताना येणाऱ्या सर्व समस्यांची शेवटच्या स्तरावर चर्चा करून, सर्व शंकांचे समाधान झाल्यावरच, एका निश्चित अवधीत योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवितात. याचेच उदाहरण. असंभव वाटणारी गोष्ट, ३० कोटी जनधन खाते बँकांनी एका वर्षांत उघडले. गेल्या पाच वर्षांत उज्ज्वला योजना असो कि सुरक्षा बीमा योजना, रस्त्यांचे कार्य असो कि रेल्वेचे, सर्वच लक्ष्य निश्चित अवधीत पूर्ण झाले. याचे कारण पंतप्रधानांची कार्य शैली  "कुठलीही जागा रिकामी राहता कामा नये" प्रथम दृष्ट्या ती कितीही महत्वहीन वाटत असली तरीहि .  

No comments:

Post a Comment