Friday, August 9, 2019

अतिवृष्टीचे खरे कारण


(इंद्राचा दरबार)

इंद्रदेव(दाढी वाढलेल्या नारदा कडे बघत):  काय समाचार आहे जम्बुद्विपाचा आणि हि दाढी काहून वाढवली नारदा! त्या दाढीवाल्या सारखी दाढी वाढवून तुला काही  जम्बूद्विपाचे राज्य मिळणार नाही. 

नारद: देवराज कशाला हो थट्टा करतात. आषाढ गेला, अर्धा श्रावणहि गेला. पावसाचे टिपूसहि पडले नाही, भरतभूमीवर. नद्या कोरड्या पडल्या आहेत. विहिरी आटल्या आहेत. पावसा अभावी पीकहि जाळून खाक झाले आहे. अजून उशीर झाला तर कोट्यावधी पशु पक्षी आणि माणसेहि तहानेने व्याकूळ होऊन मरतील. आता तुम्हीच सांगा, जिथे प्यायला पाणी नाही तिथे दाढी करायला कुठून मिळणार. अनेक दिवस झाले मी आंघोळहि केली नाही आहे. अंगाचा घाण वास येऊ नये म्हणून फॉग शिंपडून थेट दरबारात आलो आहे. वरूण देवाच्या वादळ चालकांनी नेहमीप्रमाणे कामात दिंगराई केली आहे. एकदाचची  कठोर कार्रवाई करा त्यांच्या वर, नरकात धडा त्यांना.

इंद्रदेव: अरे! रे! नारदा, हे काय ऐकतो आहे मी. यावेळी तर तुमच्या सल्ल्यानुसार मी वरूण राजाला आदेश दिला होता. सर्व वादळ चालकांनी उन्हाळ्यातच भारतात जाऊन प्रत्यक्ष ग्राउंड रिअलीटीची तपासणी करावी.  तरीही एवढी कामात दिंगराई. बोलवा रे, वरुण देवाला. 
 
(वरूणदेव दरबारात येतात)

इंद्रदेव: वरुण देवा, पावसाळा अर्धा उलटला तरी तुम्ही भरतभूमीवर वादळांचे टेंकर पाठविले नाही. काय प्रकार आहे हा. 

वरुणदेव: महाराज क्षमा असावी, अजून वादळी टेंकर भारतात मी धाडू  शकलो नाही.  

इंद्रदेव: पण का?

वरूणदेव : याला जवाबदार नारद ऋषीच.  मी नको म्हणत असतानाहि त्यांच्या सल्ल्यानुसार वादळ चालकांना भारतात पाठविले. तिथे ते थेट इंद्रप्रस्थनगरीतील एका भव्य हिरव्यागार रम्य परिसरात वसलेल्या विश्विद्यालयात उतरले. तिथे त्यांची भेट आजादी गैंगशी झाली, त्याचेच परिणाम. "हमको चाहिये काम से आजादी, हमारा शोषण बंद करो, नियमानुसार काम करेंगे. ओवर टाईम नहींं करेंगे, जितना काम उतना दाम" नारे लावत लाल झंडा घेऊन माझ्या महाला बाहेर ठाण मांडून बसले आहेत. मी कितीही समजावले कि स्वर्गात प्रत्येकाने आपले कार्य जगाच्या कल्याणासाठी केले पाहिजे. पण कुणी ऐकायला तैयार नाही. 

इंद्रदेव: मागणी तरी काय आहे त्यांची.

वरूणदेव: महाराज ते म्हणतात, सोमरसाचा कोटा वाढवून द्या. वाढलेला कोटा आधी द्या. या शिवाय....

इंद्रदेव:  थांबलात का वरूणदेव एकदाचे कळू द्या कि आणखीन काय मागणी आहे त्यांची.  

वरूणदेव: त्यांची मागणी आहे, वादळ वाडीत फक्त भारतातून स्वर्गात आलेल्या बी ग्रेड अप्सरांचे नृत्य होतात. त्यांच्या वाडीतहि महिन्यातून किमान एकदा तरी इंद्रदेवाच्या खासमखास रंभा, उर्वशी इत्यादींचे नृत्य झाले पाहिजे.

इंद्रदेव (देव काही क्षण विचार करतात आणि डोक्यावर हात मारत म्हणतात): कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या मागण्या मंजूर करतो. सोमरसाचा वाढलेला कोटा आत्ताच पाठवा आणि म्हणा त्वरित  कामाला लागा. आधी भरतभूमीवर पावसाचा बेकलाग पूर्ण करा. मग रंभेसोबत उर्वशीच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवतो वादळ वाडीत. 

वादळ चालकांची मागणी पूर्ण होताच. अक्खी सोमरसाची बाटली पोटात रिचवून पावसाळी कोटा पूर्ण करण्यासाठी वादळ चालक भरतभूमी वर पावसाचा मारा करू लागले. झिंगलेल्या अवस्थेत पाण्याचा मारा करताना कुठे किती पाउस टाकतो आहे, याचे भान त्यांना उरलेले नव्हते. त्यांना डोळ्यांसमोर  दिसत होती फक्त नृत्य करणारी रंभा आणि उर्वशी.

सोमरसाच्या नशेत धुंद होऊन पावसाच्या मारा करणार्या वादळ चालकांमुळे महाराष्ट्राच्या भूमीवर एकच हाहाकार माजला. मुंबई, पुणे कोल्हापूर छोटी-मोठी नगरे पाण्यात बुडाली. शेती उध्वस्त झाली, गुर-ढोर पाण्यात वाहून गेली. शेकडो लोकहि थेट स्वर्गात पोहचले. पण वादळ चालकांनी दोन महिन्यांचा बेकलाग एकाच  आठवड्यातच पूर्ण केला आणि गेल्या वर्षांचा बेकलोग हि पूर्ण करण्याच्या मोहिमे वर निघाले आहे.  
 

No comments:

Post a Comment