Thursday, August 29, 2019

रामसेतु आणि अज्ञानी आयआयटीयन


भारतीय प्राद्योगिकी संस्थान (आईआईटी) खडगपूरच्या दीक्षांत समारोहात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी म्हंटले रामसेतुचा निर्माण भारतीय अभियंतांनी  केला होता. मंत्र्याचे हे विधान अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या बहुतेक पचनी पडले नाही. कारण स्पष्ट आहे आपल्या प्राचीन इतिहास आणि ज्ञाना बाबतीतील त्यांची अज्ञानता.

ब्रिटिशांनी शिक्षा नीति तैयार करताना, आपल्या पूर्वजांचा इतिहास व ज्ञानाचा पाठ्यक्रमात समावेशच केला नाही. भारतीय लोकांच्या मनात हीन भावना निर्मित करून त्यांना राज्य करायचे होते. स्वतंत्रता प्राप्तीनतर  आपल्या इतिहासाला व ज्ञानाला पाठ्यक्रमात स्थान मिळाले पाहिजे होते. पण आंग्ल शिक्षित व हीन भावनेने ग्रस्त भारतीय विद्वानांनी आपल्याच पूर्वजांच्या इतिहास व ज्ञानाकडे दुर्लक्ष केले. परिणाम शिक्षण घेणारे विद्यार्थी मग ते आईआईटीयन का असेना,  त्यांना भारतीय इतिहासाची व ज्ञानाची माहिती कुठून मिळणार. 

धनुषकोडीपासून ते तलाईमन्नार (श्रीलंका)- अंदाजे २६-२७ किमीचे अंतर आहे. समुद्रात पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. या उथळ समुद्री मार्गात अनेक छोटे-छोटे बेट आज हि विद्यमान आहेत. हा भूभाग म्हणजे प्राकृतिक निर्मित एक पुलच. अधिकांश पुरातत्ववेत्ता याच भागाला रामसेतु किंवा आदम ब्रिज म्हणतात. आज हि इथे नौकायन संभव नाही. रामायण काळात अर्थात ७५०० वर्षांपूर्वी तर समुद्र आजच्या तुलनेत जास्त उथळ होता. साहजिकच होते, समुद्रात नौकायन संभव नसल्याने श्रीरामाने या स्थानावर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. श्रीरामाच्या सैन्यातील भारतीय अभियन्तानी समुद्रावर पूल बांधला. या पुलावरून श्रीरामाचे सैन्य श्रीलंकेत पोहचले. म्हणून या पुलाला रामसेतु हे नाव पडले. 

वाल्मिकी रामायणात युद्धकांडातील २२व्या सर्गात समुद्रावर सेतु बांधण्याचे वर्णन आहे. वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून काही हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. दगड व लाकडांचा उपयोग करून समुद्रावर बांधलेल्या पुलाचे अवशेष  आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतरसापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता.   


वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न  झाले याचे वर्णन करणारे, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:


ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।

बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥


ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।

कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥


बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।

चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥


हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।

पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या-मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले.  हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.


समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।

सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥


दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।

वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥


मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।

पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥


संक्षिप्त अर्थ: कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी निर्माण सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत, वेली आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते.वाल्मिकी रामायणात एवढे स्पष्ट वर्णन आहे, तरी हि तथाकथित विद्वान शंका घेतात यावरच मला नेहमी आश्चर्य वाटते.  याचे एकच कारण आपल्याच ज्ञानावर व इतिहासावर विश्वास नसणे हे असावे.

No comments:

Post a Comment