१९९०चा काळ मी ग्राहक मंत्रालयात कार्यरत होतो. सहज जाणवलें, ग्राहक हिताच्या बाता करणारे अनेक एनजीओ व प्रतिष्ठित व्यक्ती ग्राहक विरोधी कार्य करणारे आहेत. सहज एक अधिकार्याला या बाबत विचारले. तो म्हणाला पटाईत तू अजून बच्चा आहे. सरकारी कर्मचार्याने अनासक्त भावाने कर्म केले पाहिजे, जास्त विचार केला नाही पाहिजे. बाकी हें सर्व प्रतिष्ठित एम एन सी व औद्योगिक संगठनांचे हित पाहणारे आहेत, तिथून मिळणार्या पैश्यांवर यांची अय्याशी चालते. दुर्भाग्य, अश्या लोकांना दरबारी पुरस्कारहि मिळतात. पुढे वरिष्ठतम अधिकार्यांसोबत कार्य करत असताना, अनेक पांढर्या शुभ्र वेषधारी लोकांचा मग ते पत्रकार असो किंवा बुद्धिमंत, काळेकुट्ट स्वरूप समोर आले. असो.
कुणीतरी म्हंटले आहे, राजनीती आणि वैश्या यांचा चोली दामनचा संबंध असतो. पूर्वी राजे महाराजे गणिकांचा उपयोग आपला स्वार्थ सिध्द करण्यासाठी करायचे. आज आपल्या देशात लोकतंत्र आहे. विभिन्न जातीचें गणित जुळविण्यासाठी, जातीजातीत भेद उत्पन्न करून सत्ता प्राप्त करणे हें राजनेत्यांचे उद्दिष्ट असते. काही तर सत्तेसाठी आतंकवादी, नक्षली आणि जेहादी समूहांचा वापर वोट बँक तैयार करण्यासाठी करायला हि मागेपुढे पाहत नाही. देश गढ्यात गेला किंवा देशाचे तुकडे झाले आणि देशात अराजकता पसरली तरी चालेल, फक्त सत्ता मिळाली पाहिजें. असे सत्तालोलुप राजनेता आपला स्वार्थसिध्द करण्यासाठी कलाकार, पत्रकार आणि बुद्धीजीवी
इत्यादी लोकांचा गणिका समान उपयोग करतात. पत्रकारांचे विदेशी दौरे, कलाकारांना व बुद्धिमंतांना लुटीयन दिल्लीत बंगले, सरकारी
कमिटी, संस्थांमध्ये नियुक्ती, एनजीओंना,
अनुदान इत्यादी कश्यासाठी असते, हे सांगण्याची
गरज नाही.
योग्यता नसतानाही
पद मिळाले, पैसा मिळतो व देशी विदेशी पुरस्कार हि. मनात इच्छा नसतानाही
फक्त स्वार्थासाठी, पद, पुरस्कार व प्रतिष्ठेसाठी इतिहासकार विकृत इतिहास सांगतात, बुद्धीजीवी,
प्रोफेसर, पत्रकार व राजनेता आतंकवादी आणि देशाचे
तुकडे करणार्यांचे समर्थन करतात. असत्याचा व देशविरोधी तत्वांचा
प्रचार करताना मनात द्वंद्व हे निर्माण होणारच. त्याचा परिणाम विकृतीत होतो. मग विकृती
शब्दांद्वारा बाहेर पडते. असो.
No comments:
Post a Comment