Wednesday, February 13, 2019

व्हेलेंटाईन डे स्पेशल


आज सकाळी राजीव चौक मेट्रो स्टेशन - काही तरुण पोट्टे आणि पोट्टी एक घोळका करून उभे होते आणि मी लक्ष देऊन त्यांचे बोलणे ऐकत होतो:

एका तरुण पोरीने आपल्या मोबाईल वर एक फोटो त्याला दाखवीत म्हंटले, हा फोटो कसा वाटतो? हा, हिचा होणारा नवरा आहे.

तो: (फोटोकडे पाहत)  हा तर चक्क बेवडा दिसतो, हिला कसे काय पटविले याने.

फोटो दाखविणारी मुलगी दुसर्या पोरीकडे पाहत म्हणाली, हा तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला बेवडा म्हणतो? ती त्याच्या कडे रागाने पाहते.

तो: (तो तिच्या कडे पाहत) मग मी काय करू, बेवड्याला लोक बेवडाच म्हणणार. 

ती:  माझा होणारा नवरा आहे तो. खबरदार त्याला कुणी बेवडा म्हंटले तर.  तू जरूर बेवडा होणार, देवदास सारखा. माझे लग्न झाल्यावर. १०० टक्के खात्री आहे मला.

तो: स्वत:ला ऐश्वर्य राय समजते का? तुझ्या सारख्या ५६ माझ्या मागे पुढे फिरतात. 

ती: तुझ्या मागे पुढे फिरणार्या एखाद्या 'ऐश्वर्य रायचे' नाव कळेल का मला?

तो:  तुला काय करायचे आहे त्याचे?

ती: आज व्हेलेंटाईन डे आहे. तुझ्या तर्फे  तिला गुलाबाचे फूल भेट देऊ, म्हणते मी?  

तो:  मी एक पीस इथे उभा आहे, हे हि तुला सहन होत नाह. तू माझी मित्र आहे कि शत्रू. 

ती: मी तर तुझी मित्रच आहे.... पण तू???

तो: हे बघ, खांद्यावर लटकवलेली बॅग हातात घेऊन तो उघडून त्यात व्यवस्थित पॅक करून ठेवलेले गुलाबाचे फुल बाहेर काढतो. तुझ्या साठी आणले आहे, दरवर्षी आणतो, पण हिम्मत होत नाही. म्हंटले आज तुला...... जाऊ दे.... एवढी वर्षे झाली, तुला माझे प्रेम कळले नाही. मूर्ख आहे मी, तुझ्यासारख्या  निष्ठुर पोरीवर जीव लावला.
 
ती: अरे माझ्या बेवड्या, गुलाबाचे फुल बॅगमध्ये सुकविण्यासाठी नसते. पोरीच्या हातात देऊन तिला आई लव यू म्हणायचे असते, एवढेही तुला कळत नाही का? 

तो: पण आता काय उपयोग.....

त्याला सोडून सर्व पोरे जोरात हसू लागतात. ती त्याला जाऊन बिलगते. तेवढ्यात मेट्रो आली त्यामुळे पुढे काय घडले कळणे शक्य नव्हते. पण शेवट गोड झाला असावा. 

सर्व तरुण तरुणींना व्हेलेंटाईन  डेच्या  शुभेच्छा. पांढरे केसावाल्यांना  "गेले ते दिन गेले... आता भजन करा"


No comments:

Post a Comment