Friday, December 21, 2018

ब्राह्मण, आरक्षण आणि सरकारी नौकरीची तैयारी

(हा लेख ब्राह्मण समाजाला केंद्रित करून लिहिला असेल तरी सर्व मराठी माणसांवर लागू होतो). 

बलीराम तुला कितीदा एकच गोष्ट परत-परत सांगावी लागले. एसएससीचा पेपर पास तरी कसा झाला.  तो शांतपणे म्हणाला साब, १००० घंटे पढने के बाद गधा भी एसएससी का पेपर पास कर लेगा. मै तो फिर भी इन्सान हूँँ. कहो तो ४३ का पहाडा सुना दूँँ. बलीरामने चक्क ५० पर्यंतचे पहाडे पाठ केले होते. गणिताचे शेकडो फार्मुले हि.  बलीरामाला १२वीत ५० टक्के मार्क मिळाले. याला अभ्यासात गति नाही हे ओळखून मुलाने सरकारी नौकरीची तैयारी केलेली बरी, हा विचार त्याच्या वडिलांनी केला. (११वी बोर्डात आंग्ल भाषेत काठावर व द्वितीय श्रेणीत पास झाल्यावर मी हाच विचार केला होता, आपल्याला सरकारी नौकरी शिवाय अन्यत्र कुठली  चांगली नौकरी मिळणे शक्य नाही). बिहारमधून बलीराम थेट दिल्लीत आपल्या चुलत्याकडे पोहचला. दिल्लीत आल्यावर बीए (corrs) अडमिशन घेतली व एसएसचीच्या तैयारी साठी क्लास सुरु केली. रोज एसएससीची क्लास व त्या शिवाय दोन ते तीन तास घरी अभ्यास. शनिवारी रविवारी व सुट्टीत कालेजची क्लास. या शिवाय रोज  घरच्या कामात मदत करणे आलेच. वर्षभरानंतर त्याने सरकारी पेपर हि देणे सुरु केले. अनेक सरकारी पेपर दिले. अखेर यश मिळाले बळीरामने एसएससीचा पेपर पास केला  आणि २२ व्या वर्षी सरकारी नौकरीत रुजू झाला. हजारो बिहारी आज केंद्र सरकारच्या नौकरीत आहे. सामान्य बुद्धी असली तरी नियमित मेहनत करून, आज सुरवातीचा पगारच ३५००० हजारहून अधिक घेत आहेत. पण मराठी माणूस कुठे. माझ्या csss केडर मध्ये स्टेनो ते पीएसओ ६००० पोस्ट आहेत. त्यात मराठी माणूस बोटांवर मोजण्या एवढे. ब्राह्मण तर ४ ते ५, ते हि दिल्लीकर. बहुधा ते हि पुढील काही वर्षांत निवृत्त होतील. दिल्लीकरांची पुढची पिढी सरकारी नौकरीत नाही. मराठी लोकांची जनसंख्या पाहता किमान या केडरमध्ये ५०० तरी मराठी माणूस असायला पाहिजे. हीच परिस्थिती केंद्र सरकारच्या सर्व केडर मध्ये आहे. कारण काय. 

मराठी माणूस त्यात हि ब्राह्मण, ६० टक्केवाल्या मुलाला हि जबरदस्ती बीटेकला टाकतो. भरपूर पैसा खर्च करतो. नंतर त्याला १५ ते २० हजाराची नौकरी हि बमुश्कील लागते. शिकलेला असल्यामुळे क्लार्कचा पेपर द्यायला त्याला लाज वाटते. या सरकारी पेपर पास करण्यासाठी जी मेहनत व अभ्यास लागतो ती करण्याची तैयारी मराठी विशेषकरून ब्राह्मण मुलांची नसते. ग्रेजुएट होत पर्यंत पालक हि लक्ष देत नाही. मग नौकरीसाठी मुलांवर दबाव आणतात. मग मुले हि हि वेकेंसी निघाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात. दोन-चार महिन्याचा अभ्यास, अर्धवट तैयारी करून क्लार्कचा पेपर पास करणे शक्य नाही. मग म्हणतात, मुलाने पेपर दिला पास झाला नाही. आरक्षणावर खापर फोडतात. एकदा तर एका नातलगाने महाराष्ट्रातून फोन केला. माझ्या मुलाने स्टेनोचा लिखित पेपर पास केला आहे. दिल्लीला पाठवितो २ महिन्यात त्याला स्टेनोची तैयारी करून देईल का? मी म्हणालो स्टेनो शिकायला किमान २ वर्ष लागतात. तेही नियमित न चुकता ३६५ दिवस अभ्यास केला तर. त्या नंतर हि जो पर्यंत पेपर पास होत नाही रोज एक तास अभ्यास करावाच लागेल. अधिकांश मराठी मुले,  लिखित परीक्षा पास केल्यावर टाइपिंग शिकण्याचा विचार करतात. टाइपिंगचा हि रोज अभ्यास करावा लागतो.  दोन ते तीन महिन्यात टाइपिंग शिकणे शक्य नाही. अर्धवट तैयारी करून दिलेला पेपर कितीही सौपा असला तरी तो पास करणे कदापि शक्य नाही.  

सुरवातीला ३५००० हजाराहून जास्त पगार असलेल्या क्लार्क, डाटा एन्ट्री ओपरेटर, इत्यादीचा  पेपर पास करणे अत्यंत सौपे आहे. सामान्य  ज्ञान, गणित (१० स्तर),आंग्ल भाषा आणि तर्क शक्ती, हे विषय असतात. तुमच्या मुलाला १२वीत कमी मार्क्स आले. तर कालेज सोबत सरकारी पेपर तैयारी करण्यासाठी क्लास लावा. क्लास नसेल लावली तरी प्रतियोगिता दर्पण या मासिकाचे नियमित वाचन व त्यातले पेपर सोडविणे. नेटवर असलेले एसएससी, रेल्वे इत्यादींचे पेपर पैकी रोज एक सोडविणे. अभ्यासासाठी विकास पीडिया (http://mr.vikaspedia. in/ InDG)  हि सरकारी वेबसाईट सर्व भाषेंत उपलब्ध आहे. या साईटवर सर्व सरकारी योजना, इतिहास ते अर्थशास्त्र संपूर्ण ज्ञान उपलब्ध आहे. भारतकोश या वेबसाईटवर   (http://bharatdiscovery.org)  सामान्य ज्ञानच्या अर्थशास्त्र पासून ते नागरिक शास्त्र पर्यंत हजारो प्रश्नोत्तरी आहेत. दुसर्या शब्दांत सरकारी पेपरची तैयारी करण्यासाठी नेटवर सर्व साहित्य उपलब्ध आहे. इंटरनेट वर आज बँक, रेल्वे, कोर्ट, सरकारी कंपन्या, केंद्र सरकारचे एसएससीचे पेपर उपलब्ध आहेत. रोज एक पेपर सोडविला तरी तीन वर्षांत भरपूर तैयारी होते. एवढी तैयारी केल्यावर विश्वास वाढतो.  बीए, बीकॉमचे पेपर हि मुले चांगल्या मार्काने पास होतात. वयाच्या २५शी पर्यंत बँक रेल्वे सरकारी पदांसाठी अनेक पेपर दिल्यामुळे ज्ञान हि वाढते व सरकारी नौकरी सहज मिळते. आंग्लभाषा सहित अनेक विषयांचे ज्ञान वाढल्याने निजी क्षेत्रात हि चांगली नौकरी मिळते.  पण आपली मुलें काय करतात. फेसबुक, whatsup, रस्त्यावर पान तंबाकू खात टवाळक्या करणे, यातच वेळ घालवितात. काही टाईमपास म्हणून एमए, एमकॉम मध्ये अडमिशन घेतात. वेळ वाया घालवितात. स्वत:ला आणि घरच्यांना मूर्ख बनवितात. 

तात्पर्य एवढेच केंद्र सरकार, रेल्वे, बँक व राज्य सरकारच्या खुल्या प्रवर्गात हजारो पदे दरवर्षी निघतात. पण त्या नौकरींसाठी किती ब्राह्मण तरुण तैयारी करतात. नुकतेच या वर्षी रेल्वेत लाखाच्या वर पदांसाठी परीक्षा झाली. अर्धी पदे खुल्या प्रवर्गासाठी होती. किती ब्राह्मण तरुणांनी पेपर दिले. एका ब्राह्मण फेसबुक ग्रुप वर हे विचारले. कुणीही सार्थक उत्तर दिले नाही. बहुतेक कुणाचाही मुलगा सरकारी नौकरीच्या प्रयत्नात नाही. फक्त आरक्षण-आरक्षण हि ओरड करण्यात वेळ व्यर्थ घालवीत आहेत. समजा ब्राह्मणांना महाराष्ट्रात ३ टक्के आरक्षण मिळाले तरी उत्तर  प्रदेश आणि बिहारी मुले मराठी भाषा शिकून त्या जागांवर आपले नाव लिहतील. मग त्यांच्या नावाने बोंब ठोका.  

सरकारी नौकरीच्या माहिती साठी. 
 http://www.sarkarinaukridaily.in/employment-news-paper/



No comments:

Post a Comment