Monday, September 10, 2018

दुग्ध अक्रांतीचे जनक उर्फ गौवंशा विरुद्ध षड्यंत्रदिल्लीतील शहरीकृत एका गावात गायी-म्हशी बांधलेल्या होत्या. गायींची तोंडे जाळीदार कपड्याने बांधलेली होती. बहुतेक बाहेरचे कुणी काही खाऊ घालू नये म्हणून. एका भिंतीवर दुधाचा भाव लिहिलेला होता देशी गायींचे दूध ८०रु लिटर आणि म्हशीचे ६०रु लिटर. अचानक मला जुने दिवस आठवले. ७०-७२चा काळ, डीएमएसच्या दुधाच्या  डीपो वर गायीचे दुध ८०-८५ पैसे लिटर आणि म्हशीचे ६०-६५ पैसे लिटर मिळायचे. गायीच्या दुधाचा भाव बाजारात हि म्हशीच्या दुधापेक्षा जास्त होता. हरियाणात एक म्हण आहे, हुशार मुलगा पाहिजे असेल तर त्याला गायीचे दूध पाजा. पेहलवान पाहिजे असेल तर  म्हशीचे  दूध पाजा'.

अचानक देशात दुग्ध अक्रांतीचे जनक अवतरले. अदुग्ध क्रांतीची सुरुवात झाली. देशी गायी जास्ती दूध देत नाही. म्हशीच्या दुधाचे उत्पादन वाढविले पाहिजे. म्हशीच्या दुधात सिंग्धता जास्त असते, म्हशी पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी दुधाचा भाव गुणवत्तेनुसार नव्हे तर फक्त सिंग्धताच्या आधारावर ठरविण्याचा निर्णय घेतला. म्हशीचा दूध उत्पादन वाढविण्यासाठी म्हशीच्या दुधाचा भाव सिंग्धतानुसार ठेवला असता तर त्यात काहीच गैर नव्हते. पण गौपालकांचा काय दोष कि हा नियम गायींच्या दुधावर हि लावला. गायींच्या दुधात सिंग्धता कमी, त्यामुळे गायीच्या दुधाचा भाव अर्धा झाला. म्हशी जास्त दूध देतात, शेतकर्यांनी म्हशी पाळल्या पाहिजे. म्हशीच्या दुधाचा भाव वाढला तर लोक जास्त म्हशी पाळतील. देशात दुधाचे उत्पादन वाढेल. दुधाची कमतरता दूर होईल. पण या साठी गायीच्या दुधाचा भाव कमी करण्याचे कारण काय? याचे उत्तर तथाकथित दुग्ध अक्रांतीच्या जनकांपाशी नव्हते.  देशात गायींची संख्या त्यावेळी म्हशीन्पेक्षा दुप्पट होती. मग गायीच्या दुधाचा भाव किमान स्थिर तरी ठेवता येत होता. देशातील गायींचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न केले असते. आज हि सर्वच सरकारी व सहकारी संस्था गायीच्या दुधाला कमी भाव देतात.

देशात दुधासोबत गौमांस उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय गायींच्या जातींचा संपूर्ण नाश करणे हा दुग्ध अक्रांतीचा मुख्य उद्देश्य होता. त्यासाठी  कमी गुणवत्तेच्या पण अधिक दूध देणाऱ्या विदेशी गायी/ गायींचे वीर्य मागवून, संकर जाती तैयार करण्याचे कार्य सुरु झाले. प्रचार सुरु झाला, विदेशी गायी जास्त दूध देतात. या गायींच्या दुधामध्ये सिंग्धता जास्ती आहे. या गायी पाळल्या तर गौपालकांची आय वाढेल इत्यादी. पण या विदेशी गायी भारतीय वातावरणाशी ताळमेळ बसवू शकेल का? हा विचार करण्याची कुणाला हि गरज भासली नाही. भारतातील मौसमी वातावरण आणि युरोपच्या वातावरणात फरक आहे. हेच संकर गायींच्या बाबतीत घडले. जिथे कमी दूध देणाऱ्या भारतीय गायी दहा वासरू आणि ३००० दिवस दूध देतात तिथे विदेशी संकर गायी चार ते सहा वासरू आणि १५०० ते २००० दिवस दूध. शिवाय त्यांच्या रखरखाव वर खर्च हि जास्त.  विदेशी गायींच्या वासुरूंना कुबड नसल्याने, फक्त मांस उत्पादनासाठी उपयुक्त ठरले.  

फक्त दूध विकून गायी पाळण्याचा खर्च निघाला नाही पाहिजे, या साठी दुधाची ग्रेडिंग करून फुल क्रीम, फुलक्रीम, टोंन्ड व डबल टोंन्ड या आधारावर दूध विकणे सुरु झाले.  केवळ दूधच नव्हे, दही, पनीर व तूप हि गायीच्या नावानी मिळणे बंद झाले. गौपालकांना नुकसान होऊ लागले. विशेष करून देशी गायी पाळणार्यांना जास्त. कारण जनकांचा उद्देश्य, दुग्ध उत्पादन नव्हे तर गौमांस उत्पादन वाढविणे होता. भारतातून गौमांस निर्यात भयंकर गतीने वाढला. ज सर्वात जास्त गौमांस निर्यात करणारा देश म्हणजे जिथे गायीची पूजा करतात, तो आपला भारत देश. भारतात जिथे जनसंख्या जास्त, तिथे शेत जमिनीचा वापर गौमांससाठी चारा उत्पन्न करण्यासाठी होऊ लागला.

शंभर एक वर्षांपूर्वी पोर्तीगीज मोठ्या प्रमाणात भारतीय गायी आणि वळू दक्षिण अमेरिकेत घेऊन गेले. कारण तिथले वातावरण युरोपियन गायींच्या अनकूल नव्हते. आज उरुग्वे, ब्राजील इत्यादी देशांत भारतीय गायी ५० लिटर पर्यंत दूध देतात. भारतातहिउपलब्ध विभिन्न जातींच्या उत्तम वळूंचे संगोपन करून, गौपालाकांना त्यांचे वीर्य पुरवून, गायींची दुग्ध उत्पादन क्षमता सहज वाढविता आली असती. सरकारचा पैसा हि कमी खर्च झाला असता. पण असे केल्या गेले नाही. तात्पर्य एवढेच, ज्यांना आपण दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतो, ते भारतात दुग्ध अभावाचे जनक होते. भारतीय गौपालकांचे  हितचिंतक नव्हतेच.

आज हि देशात गायींची संख्या म्हशींच्या संख्येत दीडपट आहे. त्यात देशी गायी किमान ८ कोटींच्या वर आहेत. देशाचे सौभाग्यच म्हणा स्वामी रामदेव नावाचा संन्यासी भारतात अवतरला. योगासोबत भारतीय गायींच्या दुधाचे गुणगान हि त्याने सुरु केले. परिणाम, बिना सरकारी मदत आज गौपालकांनी स्वत: भारतीय गायीना पाळणे सुरु केले आहे. त्याचाच परिणाम आज तब्बल ४५ वर्षांनतर गायीच्या दुधाचा दर दिल्लीत म्हशीपेक्षा जास्त दिसला. ग्राहक पुन्हा गायीचे दुध मागू लागले आहे. अनेक दुग्ध सहकारी संस्था हि आता गायींचे दूध विकू लागल्या आहेत. 

देशी गायींचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी अनुसंधान देशात सुरु झाले आहे. खर्या अर्थाने एका नवीन दुग्ध क्रांतीची सुरुवात झाली आहे. जिथे गायीचे दूध, तूप, पनीर व गौमूत्र आणि शेणाला हि चांगला भाव मिळणार आहे. गेल्या वर्षीच पतंजली ने देशातील अनेक गौशाळांंना आत्मनिर्भर होण्यासाठी पत्येकी ५० लाख ते काही कोटींची मदत केली. पुढील महिन्यात गायीच्या दुध, लोणी, पनीर, छाछ हि पतंजलि बाजारात आणणार आहे. अनेक भारतीय दुग्ध उत्पादक त्यांचे अनुसरण करतीलच. खर्या अर्थाने भारतात दुग्ध क्रांतीला सुरुवात होईल. भारतीय गायींचे व गौपालकांचे अच्छे दिन सुरु होतील. दुग्ध अक्रांतीच्या जनकाचे षडयंत्र विफल यात काही शंका नाही.


No comments:

Post a Comment