आमचे सौभाग्य, एका महान इतिहासकारासोबत चर्चा करायला मिळाली. काय ते मानवी आनुवांशिकतेचा इतिहास ......
इतिहासकार: पटाईत, इतिहास म्हणजे पुराणातील वांगी नव्हे, मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन असते. काही डोक्यात घुसले का? युरेशिअन भटुर्क्या?
मी: म्हंजे मी युरेशिअन, तुमि कोण?
इतिहासकार: आम्ही मूळ निवासी, तुम्ही गायी मेंढ्या हाकत साडे तीन हजार वर्षांपूर्वी इथे आलात.
मी: म्हंजे, दुग्धक्रांती साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाली, मी उगाच कुरियन साहेबांना श्रेय देत होतो.
इतिहासकार: दुध क्रांतीचा आणि इतिहासाचा काय संबंध? विषयांतर करू नको भटुर्क्याSSS
मी: तेच तर मी म्हणतो, ते भटुकडे आय मीन माझे पूर्वज, युरोपियन गायींना हाकत इथे आले असतील ना. हे खरे असते तर तेंव्हाच दुग्ध क्रांती घडली असती. आता बघा न पुराण कथेत काय लिवले आहे, "गायीला नव्हता पान्हा, गोकुळात उपाशी कान्हा आणि दुधावरून बेचार्या कंसाला नाहक जीव गमवावा लागला रे S S S".
इतिहासकार: अरे, गाढवा, इतिहास म्हणजे गायी म्हशी नव्हे. तुझ्या फालतू किस्से-कहाण्या नव्हे. इतिहास म्हणजे, मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन. तुमची ती भटुकडी संस्कृत भाषा युरोपिंन परिवारातील आहे या देशातील नाही.
मी: च्यायला, आमच्या संस्कृतच्या शास्त्री सरांना खोटारडा म्हंटलेले, अस्मादिकांना मुळीच खपणार नाही. शास्त्री सर कधीच खोटे बोलत नाही.
इतिहासकार: मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नको, मानवी इतिहासाच्या चर्चेत, हे शास्त्री सर, कुठून उपटून काढले.
मी: तेच म्हणतो, आमच्या पहाडगंजच्या शाळेत संस्कृत शिकवायचे, शास्त्री सर. मला आठवीत संस्कृत मध्ये ९० टक्के मार्क असतानाही मी ९वीत हिंदी विषय घेतला. जाम रागावले शास्त्री सर. मला म्हणाले, हिंदीत तर टाॅपरला हि ७५ टक्के मिळत नाही. संस्कृत मध्ये मराठी / मद्रासी ढ मुलांना सुद्धा ७५ टक्के सहज मिळतात (अस्मादिकांची लायकी). हिंदी भाषा तर ज्यांना संस्कृत बोलणे आणि शिकणे जमत नाही त्यांच्यासाठी. (पहाडगंजच्या मराठी शाळेत ९० टक्के विध्यार्थी पाकिस्तान मधून आलेले
शरणार्थी - मुलतानी, पंजाबी आणि सिंधी इत्यादी, उरलेले १० टक्के मराठी आणि
मद्रासी इत्यादी). प्रथम श्रेणीत पास व्हायचे असेल तर संस्कृत घे. मी शास्त्री सरांचे ऐकले नाही आणि हिंदी फक्त ५५ टक्के मार्क्स मिळाले. शास्त्री सरांची भविष्यवाणी खरी ठरली.
इतिहासकार: तुझ्या या टुकार कहाणीचा इतिहासाची काय संबंध,
मी: कसा नाही, बघा मद्रासी माणूस कसा खणखणीत संस्कृत म्हणतो आणि पंजाबी माणसाला संस्कृत बोलणे कठीण जाते. मग युरेशिअन लोकांना संस्कृत कशी जमनार, काही विचार केला का यावर. मानवी आनुवांशिकतेचा इतिहास...
इतिहासकार: तुला म्हणायचे तरी काय आहे,
मी: हेच, बामन असो किंवा द्रविड सर्वच इथले मूळ निवासी. संस्कृत हि मूळ निवासी लोकांची आदी भाषा. बाकी आर्य जाती, युरेशिअन सर्व थोतांड आहे. फूट डालो राज करो नीती राबविण्यासाठी.
इतिहासकार: मी मूर्ख आहे. गाढव आहे. तुझ्या सारख्या बिनडोक माणसासोबत चर्चा करतो आहे.
मी: ओळख पटली ना.
पुढे चर्चा होणे शक्य नव्हते.
(राखीगढ येथे सापडलेल्या रथस्वाराचे डीएनए दक्षिण भारतीय वनवासी जमातीशी मिळतात. कुमारी कंदम १५००० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेले. गेल्या २० हजार वर्षांत समुद्र किमान २० मीटर वर आला आहे, मानवाला स्थानांतरीत व्हावे लागले.
आपल्या साहित्याच्या आधारावर आपण आपला इतिहास शोधला पाहिजे न कि विदेशी गुलामीचा चष्मा लावलेल्या तथाकथित इतिहासकारांच्या नजरेतून. )
आपल्या साहित्याच्या आधारावर आपण आपला इतिहास शोधला पाहिजे न कि विदेशी गुलामीचा चष्मा लावलेल्या तथाकथित इतिहासकारांच्या नजरेतून. )
No comments:
Post a Comment