मोगलीचे जंगल होते. एक काळाकुट्ट ससा आणि एक पांढरे शुभ्र कासव एका रिंगणात धावत होते. शर्यत होती जंगी. अचानक शिट्टी वाजली. शर्यत संपली. ससा आणि कासव होते तिथे थांबले. गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट. हत्ती म्हणाला ससा धावतो वेगात, तोच आहे विजेता. तवाकी म्हणाला, मला वाटते बहुतेक पांढरे कासव जिंकले असावे. निर्णयासाठी सर्वांनी, महाराज शेरखानकडे बघितले. शेरखान हि बुचकळ्यात पडला, त्याने शर्यतीची नियमावली बघितली. शेरखान म्हणाला, काळा ससा धावतो, जोरात पण कासव आणि सस्याच्या शर्यतीत नेहमीच जिंकतो कासव, असेच लिहिले आहे यात. आजच्या शर्यतीचा विजेता आहे पांढरा कासव.
अचानक माझे स्वप्न भंगले, अर्थ काही कळेना. शेरखान म्हणतो, बहुधा तेच सत्य असावे. आपले काय म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment