सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात.
आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.
योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल.
साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.
No comments:
Post a Comment