यंदा बळीराजाला कांदे ५ पैशे किलोच्या भावाने विकायची पाळी आली. आता डाळींचे भाव हि गडगडले. पहिले बळीराजा दुष्काळात मेला आता पाण्यात नक्कीच बुडणार आहे. प्रभूंच्या कृपेने रेल्वे ९२ पैश्यात १० लाखांचा विमा यात्रेकरूंना देणार आहे. जगण्याला कंटाळलेला निराश बळीराजा जर तिकीट घेऊन रेल्वेच्या गाडीत बसला तर त्याच्या मनात काय विचार येतील:
गाडीला अपघात
होऊ दे बाप्पा
मला मरण
येउ दे बाप्पा.
विम्याचे पैशे
मिळू दे बाप्पा.
मुलांचे शिक्षण
होईल बाप्पा.
शहरात नौकरी
मिळू दे बाप्पा.
उपासमार
थांबेल बाप्पा.
No comments:
Post a Comment