Friday, September 25, 2015

शिवस्वरूप खंडोबा - " एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"





इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुः
l

(ऋग्वेद १/१६४/४६)



[सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि]. 



आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवनचरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते.  खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात, त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही. 



आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भूभाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन  वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.





ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे.  हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती. 



हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पना पुढे आणली.  



यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।

सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥

(ईशान उपनिषद /६)



जो सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची  पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पना त्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.



भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि  सुरभी गायहि  आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.



काळ पुढे गेला, भरतखंडात  जनसंख्या वाढली, नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच.  जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश.  इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एकसुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषी मुनी आणि पुराणकारांनी केले.  सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला.  नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.



पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात.   प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।




2 comments: