Saturday, September 14, 2013

कर्ज धरतीचे – अन्न (आपले भोजन)


विचित्र वाटला ना विषय. पण आपल्या अगदी जवळचा आहे. जसं आपण बँकेचे कर्ज घेतो. आपल्याला ते परत करावे लागते. लोक जर कर्जाचे हप्ते देणार नाही तर परिणामी बँकेचे ही दिवाळे निघेल आणि पुढे कर्ज ही नाही मिळणार. 

खाण्याचे सर्व पदार्थ अन्न, भाज्या,फळे इत्यादी आपल्याला जमिनीतून मिळते, हे जमिनीचे कर्ज आहे आणि आपल्याला हे कर्ज फेडणे गरजेचे आहे. असे नाही केले तर जमीन ही आपल्यला शाश्वत व निरंतर करण्यास असमर्थ ठरेल. दुसर्‍या शब्दात बँकेप्रमाणे तिचे ही दिवाळे निघेल. हे सोप आणि सरळ गणित आहे. 

उपनिषदात लिहिले आहे, ‘त्याग सहित भोग’ हाच जगण्याचा मूळ मंत्र आहे. शेत जमीनीला जास्त काही नाही पाहिजे, फक्त आपल्या उपभोग नंतर उरलेले ‘अवशिष्ट पदार्थ’ कर्जाच्या हप्त्याच्या रूपाने तिला परत केलं तरी ती संतुष्ट होते आणि आपल्याला निरंतर अन्न पुरवठा करण्यास समर्थ ठरू शकते. 

प्रश्न आहे हे कसे करावे. त्यासाठी आपण सर्व प्रथम शेत जमिनीवर जाऊ. पीक काढल्या नंतर शेतावर उरलेल्या कचरा-पाचोळा शेतकरी जाळून टाकतात. उदा: गव्हाचा कचरा जाळण्या ने एप्रिल महिन्यात पंजाब हरियाणात रात्री आगीचे डोंब उसळताना दिसतात. असं वाटते, सर्वत्र आग लागली आहे. (प्रत्यक्ष अनुभव आहे) प्रत्येक पीक घेतल्या वर शेताला जाळणे ही आजची फॅशन झाली आहे. आपण विसरून जातो, ह्या कचर्‍यावर जमिनीचा हक्क आहे दुसर्‍या शब्दात आपण घेतलेल्या कर्जाचा हप्ता आहे. तो तिला परत करायला हवा. नांगरून किंवा मशिनीच्या मदतीने तो जमीनीत परत रुजला पाहिजे. शेत जाळणे बंद करण्यासाठी, सरकारला सख्ती ही करावीच लागेल. अशा शेतकर्‍यांवर दंडात्मक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. 

पीका बरोबर, चारा हा आलाच, आपले पाळीव पशु गायी-म्हशी, बैल इत्यादी चारा खातात व शेणाचा त्याग करतात. आपण शेणाचे गौर्या  बनवून, त्यांना जाळतो. या शेणावर ही जमिनीचा हक्क आहे. आली उर्जेची गरज भागविण्यासाठी उपळे जाळण्या ऐवजी, गोबर गॅस संयंत्र किंवा जास्त संख्येत पशु असतील तर शेणावर चालणारे ऊर्जा सयंत्र ही लावले जाऊ शकतात. चीन या देशात लाखोंच्या संख्येत गोबर गॅस संयंत्र आहेत आणि जगात कित्येक ठिकाणी, जिथे जास्त पशु पाळल्या जातात तिथे ऊर्जा संयंत्र ही आहेत.  भारतात ही प्रत्येक गावात एक या हिशोबाने ५-७ लक्ष गोबर गॅस संयंत्र सहज लागू शकतात. या रीतीने शेण ही शेणखत रूपाने जमीनीला परत मिळेल. 

आता शेतातून मिळणारे अन्न हे आपण खातो. आपले खाण्याचे नखरे, जनावरांपेक्षा जास्त आहे. आपल्या उपभोगा नंतर उरलेले खाद्य पदार्थ ‘विष्ठा आणि खाद्य पदार्थांचा कचरा’ ह्या दोन गोष्टी वाचतात. दिल्ली, मुंबई कुठे ही पहा, लोक आपल्या घरातला सर्व कचरा मग तो खाद्य पदार्थांचा कचरा, असो व धात्विक आणि रासायनिक कचरा सर्व एकत्र करून कुठे ही फेकतात. अधिकांश नगरात त्यात दिल्ली ही येते, सरकारी यंत्रणा कडे कचरा उचलण्याच्या मूलभूत सुविधा ‘कचरा गाड्या’ सुद्धा पर्याप्त संख्येत नाहीत. नाल्या आणि नाले सर्व प्रकारच्या कचर्‍यांनी भरलेले असतात. थोडा पाऊस येताच, रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पसरते, त्याचे कारण हेच. 

आता आपण हा हप्ता कसे  फेडणार. घरातून कचरा उचलण्याचे कार्य हे सरकार करू शकत नाही, आपण आधी हे मान्य केलं पाहिजे. घरातून कचरा आणि गल्लीबोळ्यातील नाल्यांना स्वच्छ ठेवण्याचे कार्य निजी क्षेत्रला दिले पाहिजे. कारण स्पष्ट आहे, आपण पैसा देतो तेंव्हा काम ही व्यवस्थित घेतो. प्रदूषित कचरा नाल्या मध्ये न पडो याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्या साठी कडक दंडात्मक कारवाईची अपेक्षा सरकारी यंत्रणे अपेक्षित आहे. नाल्या स्वच्छ राहतील, वेग-वेगळा कचरा अलग-अलग उचलला जाईल. सीवेज प्लांट्स मध्ये पाणी स्वच्छ केल्यावर उरलेला पदार्थ खत म्हणून वापरता येईल. 

पतंजली योगपीठमध्ये नुकताच BARC च्या सहयोगाने योगपीठच्या कचर्‍यापासून वीज (१ MG) लहान बनविणारे संयंत्र लागले आहे. उरलेला पदार्थ हा ‘खताच्या’ रूपाने मिळेलच. आपल्या जवळ याचे तकनिकी ज्ञान ही आहे. प्रत्येक शहरात आणि गावांत असे कमीत-कमी लक्ष संयंत्र तरी आपल्या देशात सहज लागू शकतात. (परमाणु ऊर्जेसारख्या विनाशकारी उर्जेची गरज आपल्याला लागणार नाही.) अशा रीतीने आपण आपला कचरा ‘खताच्या रूपाने’ ही जमिनीला कर्जाच्या हप्त्याच्या रूपाने परत करू शकतो. 

No comments:

Post a Comment