Monday, May 26, 2025

म्हशीची कथा

म्हैस निळसर काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची महिमाच न्यारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सृष्टी निर्मात्याला निळाई म्हणून संबोधित केले आहे. सृष्टीचे पालनहार विष्णुही श्याम रंगाचे आहेत. सृष्टीचे विनाशकर्ता भगवान शिव ही काळ्या रंगाचे आहेत. अर्थात ईश्वर किंवा गॉड हा काळ्या रंगाचा आहे. दुष्टांचा विनाश करणारी काळी माता ही श्याम  रंगाची आहे. काळ्या गायीला पवित्र मानल्या जाते.  म्हैस तर काळीच आहे. मग म्हशीच्या शरीरात देवतांचे निवास का नाही, म्हशीला कामधेनु प्रमाणे महत्व का नाही,  असे अनेक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतात. पण एक कथा धार्मिक ग्रंथात आहे, महादेवाने महिषाचे रूप धारण केले होते. आज केदारनाथ मध्ये महादेवाच्या महिष स्वरूपाची पूजा होते. यमराज ही महिषावर स्वार होऊन पृथ्वी लोकातील प्राण्याचे प्राण हरतात. अर्थात काही प्रमाणात म्हशीला ही देवत्व प्राप्त झाले, असे म्हणता येईल. पण गायीशी तिची तुलना होऊ शकत नाही. कामधेनु समुद्र मंथनातून प्रगट झाली होती म्हणून गायीला देवांपेक्षा श्रेष्ठ दैवीय स्वरूप प्राप्त झाले. म्हैस तर पृथ्वी लोकातील, त्यात ही भारतातील मूळ प्राणी. हिंदीत म्हण आहे, "घर की मुर्गी दाल बराबर" म्हणून कदाचित म्हशीला दैवीय स्वरूप प्राप्त झाले नाही.  आज ही म्हैस भारतात काजिरंगा आणि छत्तीसगढच्या जंगलात मूळ जंगली स्वरुपात आढळते. असो. 

जंगलात राहणार्‍या म्हशीला पाळीव कोणी आणि केंव्हा केले. याबाबत अनेक कथा आहेत. राजा सत्यव्रताला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. ऋषि विश्वामित्राने सत्यव्रतासाठी पृथ्वीवर प्रतिसृष्टी निर्मित केली. विश्वामित्राने जंगलात राहणार्‍या म्हशीला दुधासाठी पाळीव प्राणी बनविले. त्याचे मुख्य कारण म्हैस ही गायी पेक्षा जास्त दूध देते. म्हशीच्या दुधात स्निग्धता आणि प्रथिने जास्त असतात. म्हशीचे दूध प्राशन करून शरीर बलवान बनते. याशिवाय म्हैस शांत स्वभावाची असते. विश्वामित्राला हेच पाहिजे होते. चक्रवर्ती सम्राट नहुषपाशी म्हशीचे दूध प्राशन करून बलवान झालेले  सैन्य होते म्हणून त्याला स्वर्गाचे इंद्रपद मिळाले. सदेह स्वर्गात जाऊन इंद्रपदावर बसणारा एकमात्र मानव, हा सम्राट नहुष होता. म्हैस शक्तीची प्रतीक आहे. गाय मात्र दीन दुबळ्यांचे प्रतीक. राजाच्या प्रमुख राणीला राजमहिषी म्हणून संबोधित केले जाते. राजगौ म्हणून नाही. हीच आहे म्हशीची महत्ता. म्हशीचे दूध प्राशन करून पंजाब, हरियाणात पैलवान तैयार होतात. महाराष्ट्रात ही कोल्हापूर क्षेत्रे म्हशीचे दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे ही पैलवान जास्त आहे. कोल्हापूर येथील म्हशीच्या दुधाची रबडी प्रसिद्ध आहे. तीन दिवस नृसिंहवाडी आणि कोल्हापुरात होतो. कोलेस्ट्रॉल वाढण्याची पर्वा न करता रोज म्हशीच्या दुधापासून बनलेल्या रबडी वर ताव मारला. सैन्यात जाण्याची इच्छा असणार्‍या, खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या  मराठी तरुणांनी म्हशीचे दूध अवश्य प्राशन केले पाहिजे. 

गाय म्हातारी झाली किंवा तिने दूध देणे बंद केले की तिला गोपालक गोशाळेत सोडतात. तिथे जागा नाही मिळाली की रस्त्यावर सोडतात. जिथे कचरा खात गाय शेवटची घटका मोजते. याशिवाय गो तस्कर आणि गो भक्त यांच्यात होणार्‍या हाणामारीत अनेकांचे प्राण ही जातात. 

म्हातार्‍या म्हशींची काळजी घेण्यासाठी गोशाळा प्रमाणे म्हैसशाळा नाही.  अधिकान्श म्हशी म्हातार्‍या होण्यापूर्वीच कसायांना विकल्या जातात.  आयुष्यभर दूध देणारी म्हैस ही, तिला कसायाला देणार्‍या कृतघ्न माणसाला,  मरण्यापूर्वी  काही हजार रुपये देऊन जाते. म्हशीला खरे गांधीवादी म्हणता येईल. म्हशीचे मांस आणि चर्म विकून भारताला भरपूर विदेशी मुद्रा मिळते. असो. 


Thursday, May 22, 2025

तोरई (दोडके) कोथिंबिर सूप




आज सकाळी सौ. मुगाची डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवत होती. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 300 ग्राम, उरले होते. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. डोक्यात विचार आला. आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविले होते. कोथिंबिर कापल्या नंतर काड्या उरलेल्या होत्या. त्या सोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला.  एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता). कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पानी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोहया सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. लहान मुले ही हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो. 

टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. 









Tuesday, May 20, 2025

जागो ग्राहक: तुमच्या टमाटो केचप मध्ये टमाटो पेस्ट किती


आमच्या घरी पतंजलि टमाटो केचप येतो. महिन्यातून एकदा घरापासून 11 किमी दूर असलेल्या पतंजलि मेगास्टोर मधून महिन्याचा किराणा आणतो. टमाटो केचप ही तिथून विकत घेतो. पतंजलि टमाटो केचप मध्ये 28 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत फक्त 17 पैसे प्रति ग्राम. दुसरी कडे सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या किसान मध्ये 14.6 टक्के टमाटो  पेस्ट असते आणि किंमत 19 पैसे प्रति ग्राम. काही ब्रण्ड्स मध्ये तर आणखीन कमी टमाटो पेस्ट असते आणि किंमत जास्त असते. तुम्ही पण आपल्या घराचे टमाटो केचप तपासून बघा. 

काही दिवसांपूर्वी टमाटो केचप संपले. सोसायटीच्या बाहेर मार्केट आहे. तिथल्या दुकानदाराला विचारले. तो म्हणाला आम्ही पतंजलिचे समान ठेवत नाही. ते 15 टक्के पेक्षा जास्त मार्जिन देत नाही. इथले भाडे आणि रखरखवसाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. दूध, दही, अन्न-धान्यात मार्जिन मिळत नाही. त्यामुळे इतर वस्तूंत किमान 25 टक्के मार्जिन मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असते.  त्याचे म्हणणे खरे होते. नोएडात पतंजलि स्टोर गावांत आहेत. शहरी माल आणि मार्केट एखाद दुसरे असेल. दुकानदार फक्त जास्त विकणारी वस्तुसाठी कमी मार्जिन घेतील. उत्तम दर्जाचे उत्पाद विकण्यात त्यांचा किंचित ही उद्देश्य नसत. त्यांना ग्राहकांची काळजी मुळीच नसते. ग्राहक ही आळशी असतो तो कधीच पॅकेट वर लिहलेले वाचत नाही. तो फक्त ब्रॅंड पाहतो. पतंजलि आणि किसानच्या पॅकेटांचे चित्र खाली दिले आहे. तुम्हीच ठरवा कोणते केचप विकत घ्यायचे. 











Friday, May 16, 2025

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या. सरकारचा मुख्य उद्देश्य देशात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढविणे आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे होता. आज ही अनेक राज्यांत गाय पाळण्यासाठी सरकार अनुदान देते. गौ सेवा केल्याने शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले. दूध आयात कमी झाला. आज आपण दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात ही करतो. देशात १९ कोटी गायी आहेत त्यात 5 कोटी विदेशी आणि संकर गायी आहेत. त्यात 13 कोटी गायी दूध देणार्‍या आहेत. दुधाचे उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 एमटी होते जे वाढून 23-24 मध्ये 239.2 एमटी झाले. दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात 2014 मध्ये 141.39 मिलियन युएस डॉलर होता तो 23-24 मध्ये वाढून 272.64 मिलियन डॉलर झाला. देशात अमूल, मदर डेअरी, नंदिनी सारखे मोठे ब्रॅंड तैयार झाले. कोट्यवधी शेतकर्‍यांना त्याच्या लाभ झाला. असो 

आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. आज ही आपण  यज्ञ हवन आणि धार्मिक समारंभात आपण गायीच्या गोवार्‍यांच्या उपयोग करतो. पूर्वी आणि आज ही गावांत घर शेणाने सावरतात. पावसाळ्यानंतर घराच्या भिंतींचा रखरखाव करण्यासाठी ही शेणाचा उपयोग होतो. गायीच्या शेणापासून, उदबत्ती, धूप, संभ्राणी कप, हवन कप, दिवे इत्यादि पूजा सामग्री बनतात.  आता तर भिंती रंगविण्याचे पेंट ही शेणा पासून बनू लागले आहेत. 

शंभर वर्षांपूर्वी आणि आज ही भारतात ग्रामीण भागात आणि जगात अनेक भागांत घरांच्या निर्मिती साठी माती आणि शेणाचा वापर होतो. काही वर्षांपूर्वी अशोक नगर जवळ एका मराठी जमींदाराच्या शेताला भेट दिली होती. बाहेर भयंकर गरमी होती पण शेतात असलेल्या मातीच्या (माती आणि बांबू वापरुन पूर्वी घरे बनत होती) आणि वरती मातीची  कौलारू छत)  घरात वातावरण थंड होते. मातीच्या घरांच्या निर्मिती आणि रखरखावचा खर्च अत्यंत कमी असतो. या शिवाय भूकंप इत्यादि आल्या तरी तुमचे प्राण वाचण्याची शाश्वती. आज गायीच्या शेणापासून वीट,टाईल्स बनतात. शेणापासून बनलेल्या वैदिक प्लास्टरचा आणि पेंटचा उपयोग केला तर घराचे तापमान बाहेरपेक्षा आठ ते दहा डिग्री कमी राहते.  घराच्या निर्मितीचा खर्च ही कमी येतो. याशिवाय ज्याच्या कडे गाय आहे. तो गोबर गॅसचा वापर करू शकतो आणि खत तर बाई प्रॉडक्ट म्हणून तैयार होणारच. घरासाठी शेणाचा वापर पर्यावरणाला पोशाक ही आहे आणि खर्च वाचविणारा ही आहे.  

आज अधिकान्श शेतकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. सरकारी ही रासायनिक खतांवर भारी भरकम अनुदान देते.  पण जेवढा शेतकर्‍यांचा खर्च वाढत जातो तेवढे उत्पादन मिळत नाही. या शिवाय कितीही रासायनिक शेती केली तरी दर दोन किंवा तीन वर्षानी प्रति हेक्टर 12 ते 15 टन शेण खत विकत घेऊन  शेतात टाकावे लागते. किमान तीस ते 50 हजार खर्च करावा लागतो. 

देसी गायीच्या गौ मूत्रात असंख्य सक्रिय संयुगे असतात. मुख्यत: नाइट्रोजन, युरिया आणि खनिज इत्यादि ज्यांचा वापर खत आणि कीटनाशक बनविण्यात वापर होतो. गौ मूत्रात तांबे, लोह आणि जास्त सारखी खनिजे सापडतात जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गायीच्या शेणात ही असंख्य संयुगे असतात. नायट्रोजन, फास्फोरस, पोटाशीयम असतात. असंख्य सूक्ष्मजीव असतात जे मातीच्या आरोग्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेतीत गौ मूत्र आणि शेणाच्या वापराने शेत जमीन सुपीक आणि समृद्ध होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते. एखाद वर्षी पाऊस कमी झाला तरी शेती होऊ शकते. पण यांच्या जास्त वापराने जमिनीचा पोत बिघडतो. कालांतरात जमीन नापीक होते. जमिनीतील पानी ही प्रदूषित होते. कृषि वैज्ञानिकांच्या मते विशेषकरून रासायनिक खतांचा वापर कमी झाला नाही तर भविष्यात जमिनीतील पानी पिण्याचे सोडा ओंघोळीच्या लायकीचे राहणार नाही. आज रासायनिक खतांचा आणि किट नाशकांचा परिणाम शेतकर्‍यांना भोगावा लागतो आहे. एक तर  शेतीचा खर्च वाढला दूसरा लाखो शेतकरी कॅन्सर ग्रस्त  होतात.  पंजाबातून बिकानेरला जाणार्‍या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. रासायनिक खत आणि किटनाशक वापरुन पिकावलेले अन्न ही विषाक्त असते. अश्या अन्नाचे सेवन करून कोट्यवधी लोक दरवर्षी रोगग्रस्त होतात. हजारो कोटी उपचारावर खर्च होतात. आज हजारो शेतकरी पुन्हा गोमय आधारित शेतीकडे वळत आहे किंवा स्वत:च्या वापरासाठी उपयोग करत आहे. 

आयुर्वेदात रूग्णांच्या उपचारासाठी पंचगव्याचा वापर होतो. गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो. आज मोठ्या प्रमाणात गौ मूत्रावर संशोधन सुरू आहे. फिनायाल एवजी घरात  गोनायलने  (डिस्टील गो मूत्र आणि पाणी,  कडू लिंब, निलगिरी, वज आणि पाईन तेल पासून) फरशी पुसली तर किटाणू आणि जिवाणू पासून सुरक्षा ही मिळते आणि अपायकरक ही नसते. आज हजारो गोशाला गोनायल, आंघोळीचे साबण आणि गो अर्क बनवितात.  एका स्वदेशी कंपनी ने 100 कोटीहून जास्त रुपयांचे गो अर्क आणि गोनायल गेल्या वर्षी विकले. शेतकर्यांना ही गोमूत्र विकून एका लीटरचे पाच ते दहा रुपये  सहज मिळतात. गेल्यावर्षी   गोमय  निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला. 

जर गोपालक आणि शेतकर्‍याने गोमयचा आर्थिक दृष्टीकोणातून उपयोग केला तर गौ मूत्र आणि शेण यातून विभिन्न जीवनावश्यक उपयोगी पदार्थांची निर्मिती करून  गायीच्या दुधापेक्षा जास्त कमाई करू शकतो.  शेतकरी एक गाय पाळून किमान एक हेक्टर शेतीत गौ मूत्र आधारित किटनाशकांचा  आणि शेण आधारित खतांचा उपयोग करून खर्च वाचवू शकतो. जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची सुपीकता आणि पाणी धरण करण्याची क्षमता वाढवू शकतो. जास्त नफा मिळवू शकतो. 

गायीच्या गौ मूत्र आणि शेणाचे आर्थिक महत्व आपल्या ऋषींना माहीत होते म्हणून ते म्हणाले   "गोमय वसते लक्ष्मी


Friday, May 2, 2025

समर्थ विचार: पाद सेवन भक्तिचे सांसारिक महत्व


पाद सेवन तेंचि जाणवें.
काया वाचा मनोभावें. 
सद्गुरूचे पाय सेवावे. 
सद्गतीकारणे.  
(दासबोध ४/२)

पाद सेवन भक्ति म्हणजे गुरूचे पाय चेपणे नव्हे. समर्थ म्हणतात सद्गुरूने दिलेल्या मंत्राचा अर्थात ज्ञानाचा, काया वाचा मनोभावे जप करणे अर्थात त्यावर मनन चिंतन करणे. प्राप्त ज्ञानाचा उपयोग कसा  करवा हे जाणून घेणे. सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाचा संसारीक जीवनात आणि अध्यात्माच्या प्रवासात उत्तम रीतीने वापर केल्यानेच आध्यात्मिक आणि संसारीक मार्ग सुकर होतो. समर्थ पुढे म्हणतात,  
 
जें अभ्यासें अभ्यासितां नये.
जें साधनें असाध्य होये. 
तें हें सद्गुरूविण काये. 
उमजों जाणे. 
(दासबोध ४/२०)

अभ्यास करून, पुस्तके वाचून, यूट्यूब, एआईची मदत घेऊन ज्ञान प्राप्ती होऊ शकते. पण ज्ञानाचा वापर कसा करावा हे कळू शकत नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील सद्गुरू शोधावा लागतो आणि त्याच्या कडून ज्ञानाचा सांसारिक पक्ष  शिकवा लागतो. त्यासाठी  भगवद्गीतेत, भगवंत म्हणतात: 

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || 34 ||

आयटीआय मधून एकाने ऑटोमोबाइल मध्ये डिप्लोमा घेतला. लगेच गराज उघडून तो गाड्या ठीक करू शकणार का? उत्तर नाही. त्याला त्या क्षेत्रातील उत्तम उस्तादाकडे जावे लागेल. श्रद्धापूर्वक त्याची सेवा करावे लागेल. विनम्रतेने प्रश्न विचारून मनातील शंका दूर करून घ्यावा लागतील.  या साठी त्याला सतत उस्तादच्या सांधित्यात राहावे लागेल. त्याला रोज 18 तास काम करावे लागले तरी त्याने ते पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे. तेंव्हाच त्याला उस्ताद कडून कामाचे बारकावे शिकायला मिळेल. त्यानंतरच तो स्वत:चे गराज उघडून गाड्या दुरुस्तीचे काम उत्तम रीतीने करू शकेल. 

डॉक्टर असो, वकील असो किंवा किराण्याची दुकान उघड्याची असेल,  सर्वांना सद्गुरूची (त्या क्षेत्रातील जाणकार) सेवा करून प्राप्त विद्येचा उपयोग कसा करवा हे शिकावे लागते. सद्गुरूच्या चरणी बसूनच  सांसारिक उन्नतीचा मार्ग आपल्याला सापडतो. हेच पाद सेवन भक्तीचे सांसारिक महत्व आहे.