Wednesday, February 26, 2025
घरच्या देव्हार्यातील देव आणि भगवान बुद्धाची शिकवण.
Sunday, February 23, 2025
शिक्षण आणि विटाळ पाळणे
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात. असे अर्ध-शिक्षित लोक त्यांच्या कृतीने ते अशिक्षित आहेत हे दाखविण्याचा कोणताही मौका सोडत नाही.
आता दूसरा प्रश्न विटाळ म्हणजे काय? स्त्रीच्या शरीरातून महिन्यातून काही दिवस अनुपयोगी आणि अपायकारक स्त्राव बाहेर पडतात. या दिवसांना, स्त्रीची मासिक पाळी किंवा स्त्री विटाळशिण झाली, असे शब्द भाषेत आहे. अश्या अनुपयोगी, अपायकरक स्त्रावतून कुणाचाही जन्म होत नाही. अजून तरी जेंव्हा स्त्री आणि पुरूषांचे बीज एकाकार होतात आणि त्यांचे पोषण स्त्रीच्या गर्भात होते, तेंव्हाच नवे बाळ जन्माला येते. विटाळातून कुणाचाच जन्म होत नाही.असो. स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्राव जमिनीवर पडू नये, त्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून आजच्या आधुनिक स्त्रीया पैड इत्यादि वापरतात. पण शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशात अधिकान्श स्त्री आणि पुरुष अंतर्वस्त्र वापरत नव्हते. मी स्वत: सहावीत गेल्या पहिल्यांदा अंडर वेयर घातली होती. ही 1980 पूर्वी महानगरातील परिस्थिति होती. बहुतेक ब्रा-पेंटी इत्यादिंचा वापर महानगरात 100 वर्षांपूर्वी सुरू असेल. अजूनही 100 टक्के ग्रामीण भागात या अंतर्वस्त्रांचा प्रसार झाला नसेल. पूर्वीच्या काळात स्त्रीच्या शरीरातील बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्रावाने घरातील आणि बाहेरचे वातावरण प्रदूषित होऊ नये यासाठी उपाय शोधणे गरजेचे होते. या शिवाय मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव होण्याने स्त्रीला शारीरिक विश्रांतीची ही गरज असायची. त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली. स्त्री विटाळशिण झाली की तिला विश्रांति मिळावी या हेतूने विटाळशिण स्त्रीला वेगळे ठेवण्याची परंपरा समाजात रूढ झाली. त्याकाळच्या सामाजिक स्वास्थ्य दृष्टीने ती व्यवस्था सर्वोत्तम होती. आजच्या काळात अधिकान्श कामांसाठी आधुनिक उपकरण उपलब्ध असतात तरी ही शिक्षित डॉक्टर स्त्रीला मासिक पाळीच्या काळात जास्त शारीरिक श्रमांचे काम न करण्याचा सल्ला देतात.
काळानुसार समाज आणि परिस्थिति बदलत रहाते. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याकाळच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा विचार करणे ही गरजेचे असते. मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते. पण चिंतन आणि मनन करण्याची क्षमता नसलेले अर्ध-शिक्षित सर्व जुन्या सामाजिक परंपरांबाबत निरर्थक विधान करतात त्यासाठी हा लेख.
Monday, February 10, 2025
दिल्ली मराठी साहित्य सम्मेलन : दिल्ली कर मराठी कवींच्या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.
बजेट आले आणि लग्न तुटले.
ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले. ग्राऊंड फ्लोर वर एक मोठा हॉल, दोन बेड रूम, मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर पाहुण्यासाठी एक रूम ही. घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती. जाई जुई, मोगरा, गुलाब, सदाफुली इत्यादि फुलांच्या झाडे आणि वेली ही होत्या. मुंबई पुण्याच्या भाषेत एक बंगलो त्यांनी बांधला होता.
सदाने नागपूरच्या एका महाविद्यालतून आयटी शिक्षण घेतले. एमबीए ही केले. पण भरपूर प्रयत्न करून ही त्याला नागपुरात नौकरी मिळाली नाही. अखेर त्याने पुण्याची वाट धरली. त्याला पुण्यात एका आयटी कंपनीत 25 हजार पगारावर नौकरी मिळाली. एका बंगल्यात राहणारा सदा पुण्यात दोन-चार तरुणांसोबत एका फ्लॅट मध्ये राहू लागला. पुण्यात पंचवीस हजारात एका व्यक्तीचे जीवन निर्वाह होणे कठीण, संसार थाटणे शक्यच नाही. सदाचा पगार कमी असल्याने पुण्याच्या नौकरी करणार्या मुलींनी त्याला भाव देणे शक्यच नव्हते. तसे ही पुण्याच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात. त्यामुळे सदाने लग्नाचा विचार सोडून दिला. त्यात करोंना आला, कंपनी ने दोन वर्ष पगार वाढ रोखून ठेवली. पण अखेर सदाचे नशीब बदलले.
नागपुरात ही आयटी कंपन्या येऊ लागल्या होत्या. सदाला गेल्यावर्षी एका कंपनीत 50 हजारची नौकरी मिळाली. त्यात नौकरी ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यन्तची. सदा तर भलताच खुश झाला. नुकतीच त्याची 30 उलटली होती. त्याला लग्नाची घाई झाली होती. नौकरी करणारी मुलगी भेटली नाही तरी वडिलांची पेन्शन आणि त्याच्या पगारात उत्तम रीतीने जगता येणे शक्य होते. त्याच्या वडीलांनी वधू संशोधांनाची मोहीम हाती घेतली. पण इथेही लोचा झाला. जिथे पुण्या-मुंबईच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात, तिथे नागपुरकर मुलींना पुण्या-मुंबईचे डोहाळे लागलेले असतात. अखेर गेल्या महिन्यात एका मुलीने होकार दिला.
एक तारखेला निर्मला ताईंनी बेजेट पेश केले. इन्कम टॅक्स लिमिट 12 लाखांपर्यंत वाढविली. पाच फेब्रुवारीच्या माघाष्टमीच्या शुभ दिवशी सदाचे वडील पुढील बोलणीसाठी मुलीवाल्यांकडे केले. सदा ऑफिसात गेला. संध्याकाळी सदा घरी पोहचला. वडील बैठकीत बसलेले दिसले नाही. त्याने आईला विचारले बाबा कुठे, त्याची आई म्हणाली बाबा वरती गच्चीवर गमल्यातील फुलांच्या झाडांना पाणी देत आहे. तू हात पाय धूऊन कपडे बदलून ये, मी चहा ठेवते. सदा हात पाय धूऊन कपडे बदलून बैठकीत आला. त्याची आई चहा घेऊन आली. वडील ही चहासाठी खाली आले. सदाने वडिलांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. त्याचे वडील म्हणाले सदा, मुलीवाल्यांनी नकार दिला. सदाने त्याचे कारण विचारले. त्याचे वडील म्हणाले मुलीवाले म्हणतात मुलगा किमान इन्कम टॅक्स भरणारा असावा. .....
होणारा जावई इंकम टॅक्स भरत नाही. ही तर आम्हासाठी लजास्पद बाब आहे. अश्या घरी मुलगी देणे शक्य नाही. सदा आपल्या पे स्लिपला पाहत विचार करू लागला पगार पन्नास हजार ते लाख रुपये पोहचायला किमान पाच वर्ष तरी लागतील. पाच वर्षांनी पुन्हा इन्कम टॅक्स लिमिट वाढली तर आपले कधीच लग्न होणार नाही.