सनातन धर्मात घरात ही देवांची पूजा करण्याची परंपरा आहे. घरच्या देव्हार्यात पाच देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही संख्या व्यक्तीच्या श्रद्धेनुसार कमी जास्त राहू शकते. (काही लोक फक्त एकाच देवाची पूजा करतात). हे पाच देव आहेत गणपती, शंकर, सूर्य, देवी आणि विष्णू. आज अधिकान्श घरातील देव्हार्यात सूर्य देवाला स्थान नसते. त्या एवजी भगवान दत्तात्रयाची मूर्ती किंवा कुळ देवता/कुळ देवीच्या मूर्ती असते. भगवान विष्णु एवजी बाळकृष्ण असतो. भगवान शंकरच्या मूर्ती एवजी चांदीची छोटी पिंडी असते. घरातील पूजा आपण अर्ध्या तासाच्या आत करतो त्यामुळे सर्व देवतांना घरच्या देव्हार्यात स्थान देणे कठीणच आहे. बाकी देवतांच्या दर्शनाला आपण मंदिरात जातो, देव दर्शनासाठी यात्रा करतो, वारीत जातो. भगवान बुद्ध ही विष्णूचे अवतार असल्याने घरच्या देव्हार्यात त्यांना अप्रत्यक्ष स्थान मिळाले आहे. सर्वच मंदिरांत दशावतारात भगवान बुद्धाला स्थान आहे. उदा. महाराष्ट्रातील कोपेश्वरचे (शंकराचे) यादव काळातील मंदिरांत खांबांवर विष्णूचे दशावतार चित्रित आहे. त्यात भगवान बुद्ध ही आहेत. अयोध्येच्या राम मूर्तीत ही भगवान बुद्ध आहेत.
भगवान बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला. सूर्य वंशातील राजा शाक्य पासून शाक्य कुळ सुरू झाले. बौद्ध ग्रंथ दशरथ जातक अनुसार भगवान बुद्ध हे पूर्व जन्मी श्रीराम होते. त्याकाळी सनातन धर्मात आलेले दोष दूर करण्यासाठी भगवान बुद्धाने सम्यक ज्ञानाची अवधारणा आपल्याला दिली.
भगवान बुद्धाची सम्यक ज्ञानाची शिकवण सनातन धर्मात सांगितलेल्या धर्माच्या दश लक्षणांसाखीच आहे. धर्माचे दहा लक्षण- धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, स्वच्छता पाळणे, इंद्रियांना वश मध्ये ठेवणे, बुद्धि, विद्या, सत्य आचरण आणि क्रोध न करणे आहेत. श्रीमद भगवद्गीतेतील धर्म मार्गावर चालणार्या स्थितप्रज्ञ (सम्यक) व्यक्तीचे जे लक्षणं आहेत त्याच अनुसार भगवान बुद्धाने धर्माची हीच लक्षणे सम्यक् दृष्टि,सम्यक् संकल्प, सम्यक् वाक् सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव-सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति सम्यक् समाधिच्या माध्यमाने सांगितली आहे.
बाकी भगवान बुद्धाच्या शिकविणेचे पालन सनातन धर्मीय करतात. समाजात तेढ निर्माण करण्याची घातक वृती पासून दूर राहावे हीच अपेक्षा.
No comments:
Post a Comment