भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन.
बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार. खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल. मी उतरलो, जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. तो जोरात हसला आणि म्हणाला, देशभक्त जरा मागचे रेकॉर्ड तपासून बघ. पदक वाढले तरी जास्तीत जास्त दहा-पंधरा वाढतील 100 तर निश्चित होणार नाही. (आकड्यांची खेळण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची सवय), पैज लाव. मी पैज लावत नाही, हे तुला माहित आहे. पण भेटल्यावर माझ्या तर्फे चाय पकौडे किंवा तुझ्या तर्फे लंच.
या वेळी पहिल्यांदा सोनी लिव्ह वर सर्व खेळ पहिले. दिवसभर टीव्ही समोर बसून, चहाचे घोट घेत खेळाडूंना प्रोत्साहन देणे सुरू केले. एक दिवस सौ. ने कंटाळून आयुष्यात प्रथमच विचारले, आजकाल लिहणे सोडून दिले आहे का? मी उतरलो १०० पूर्ण होऊ दे, मग ठरवेल काय लिहायचे ते. दिवसभराच्या भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची चीरफाड करणाऱ्या समीक्षकांना ही १०० पदक मिळतील याची खात्री नव्हती. माझे मन ही सांशक होते. पण विश्वास होता बाकी मंत्रालयाच्या टार्गेट प्रमाणे हे लक्ष्य ही निश्चित पूर्ण होईल. बाकी १०७ पदक मिळाले तरी सोनी लिव्हच्या समीक्षकांपाशी सरकारची तारीफ करण्यासाठी शब्द नव्हते. असो.
काल मित्राला फोन करून त्याला विचारले, कुठे सुजले असेल तर बरनाल घेऊन येऊ का? दोन चार शिव्या देत तो म्हणाला, मला माहित आहे, दिवसभर टीव्ही समोर बसून तू काळी जादू करत असणार, त्या शिवाय हे शक्य नाही. मी उतरलो, तुला माहित होते, तर पैज का लावली. मी लवकरच भेटायला येणार आहे लंच तैयार ठेव.
चला शंभरी पार झाली. आता १५० करायचे असेल तर तैराकी, जिमनॅस्टिक आणि इतर खेळांवर वर ही काम करण्याची गरज आहे. निवडणुकीत विपरीत घडले नाही तर २०३० पर्यंत हे लक्ष्य निश्चित पूर्ण होऊ शकते.
शेवटी, मी ऑलम्पिक चॅम्पियन आहे. मला ट्रायल देण्याची गरज नाही. मी सरकारला ब्लॅकमेल केले. एशियन गेम्सचे तिकीट पटकावले. पण गर्वाचे घर नेहमीच खाली होते. हे मात्र त्याला कळले नाही.
No comments:
Post a Comment