ज्ञात ज्ञानाच्या आधारावर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे म्हणजे विज्ञान. पण ज्ञात ज्ञान माणसाची जशी-जशी प्रगति होते तसे-तसे बदलत राहते. प्राचीन काळी कणादला कळले होते प्रत्येक पदार्थ हा अणु पासून बनतो. पण अणुचा आकार त्याकाळी सिद्ध करणे संभव होते का? पहा विद्वानांच्या सभेत काय झाले असेल,
सभापति विज्ञानवादी विद्वान म्हणाले, कणाद, सर्व जड पदार्थ अणु पासून बनतात हा तुझ्या सिद्धांत सर्वांनाच मान्य आहे. पण तू म्हणतो अणुचा आकार अत्यंत सूक्ष्म असल्याने तो डोळ्यांनी दिसणे शक्य नाही, त्यामुळे त्याचे वर्णन करणे अशक्य. कणाद, जड पदार्थाचा अणु जर डोळ्याने दिसत नसेल तर तो पदार्थ ही दिसणार नाही. धुळीचे कण अत्यंत सूक्ष्म असले तरी सूर्याच्या प्रकाशात दिसतात. अणुचा आकार आणि तो का दिसत नाही हे स्पष्ट करणे गरजेचे, असे आम्हाला वाटते. कणाद ने काही वेळ विचार केला आणि म्हणाला, सभापति, बहुतेक एक अणु धुळी कणांपेक्षा किमान सहा पट सूक्ष्म असू शकतो त्यामुळे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. सभापती कणादला म्हणाले, कणाद, तू एका धुळी कणाचे सहा तर सोड, किमान दोन तुकडे करून दाखवू शकतो का? कणाद ने उत्तर दिले, क्षमा करा हे संभव नाही. सभापति म्हणाले, जे संभव नाही त्याच्या स्वीकार विद्वान करत नाही. कणाद, विज्ञानाला प्रमाण हवे असते. अनुमानाच्या आधारावर विज्ञान चालत नाही. बिना प्रमाण लोक सत्याचा ही स्वीकार करत नाही. तूर्त अणु हा धूलि कणा एवढाच म्हणता येईल. त्या काळच्या ज्ञात ज्ञानानुसार धुळीचा कण हा सूक्ष्म पदार्थ होता. आजच्या मोजमाप करणार्या यंत्रांनी आपण अणुपेक्षा ही सूक्ष्म पदार्थांना सहज मोजू शकतो. आज जर कणाद असते तर त्यांचे उत्तर वेगळे असते. त्याचे प्रमाण ही ते देऊ शकले असते. असो.
असाच एक किस्सा स्वामी रामदेव यांनी सांगितला होता. गंगोत्रीच्या वर हिमालयात साधना करीत असताना, अनेक जिज्ञासु योग प्राणायामच्या माध्यमाने कुंडलिनी जागृत करण्यासाठी काय करावे असे प्रश्न विचारीत. स्वामी रामदेव त्यांना योग प्राणायाम कसे करतात इत्यादि शिकवायचे. जेवढा जास्ती अभ्यास तेवढी कुंडलिनी जागृत करण्याची संभावना जास्त. यासाठी जिज्ञासु घरी गेल्यावर रोज अनेक तास प्राणायाम करू लागले. पुढे ते म्हणाले कुंडलिनी कुणाची जागृत झाली कि नाही हे मला माहीत नाही, पण अनेकांनी परत येऊन सांगितले प्राणायाम केल्याने त्यांना असाध्य रोगांपासून मुक्ति मिळाली. असे अनेक दृष्टान्त पाहून मी योग प्राणायामच्या प्रसारासाठी आपले आयुष्य वाहून देण्याचा निश्चय केला. असाच एक जिज्ञासु दिल्लीच्या एका प्रख्यात हॉस्पिटल मध्ये एका असाध्य रोगाचा उपचार घेत होता. प्राणायाम करून काही महिन्यातच तो रोगमुक्त झाला. हे पाहून, त्याच्या उपचार घेणार्या डॉक्टरने स्वामीजींना विचारले तुम्ही कोणते औषध दिले जेणे करून हा रोगमुक्त झाला. स्वामीजींनी त्याला कोणते ही औषध दिले नाही हे सांगितले. डॉक्टर विज्ञानवादी होता, त्याच्या मते स्वामीजींनी औषधीचे नाव आणि मात्रा इत्यादींची माहिती दिली तर त्यावर अनुसंधान करून हजारो रुग्णांचे भले करता येईल. फक्त योग आणि प्राणायाम करून रुग्ण रोग मुक्त होऊ शकत नाही यावर डॉक्टर ठाम होते. अखेर डॉक्टरने विचारले, स्वामीजी विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगा प्राणायाम करुन हा कसा ठीक झाला. स्वामीजींना त्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण होते. शेवटी स्वामीजी उदाहरण देत म्हणाले डॉक्टर साहेब मोहरीचे बी शेतात पेरले, मोहरीचे रोप वाढले आणि त्यातून तेल मिळाले. मोहरीने सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या मदतीने मातीतून तेल सोशून घेतले, असे ही म्हणता येईल पण ते सिद्ध करता येईल का. आता जर मी माती तेलाच्या घाणीतून काढेल तर मला तेल मिळेल का? नाही. या घटकेला प्राणायाम करून माणूस रोगमुक्त कसा होतो, हे मोजण्याचे साधन माझ्याजवळ नाही. त्यामुळे ज्ञात ज्ञानाच्या मदतीने हे मी सिद्ध करू शकत नाही. पण प्राणायाम करून रुग्णांना असाध्य रोगांपासून ही मुक्ति मिळते याचे जीवंत प्रमाण हजारो आहेत. आज पतंजलि रिसर्च फाऊंडेशन ही संस्था योगावर अनुसंधान करते आणि रिसर्च पेपर्स ही प्रकाशित करते. आज ते विज्ञानच्या आधारावर योग आणि प्राणायामाचे परिणाम सिद्ध करू शकतात. असो
आपले ज्ञात ज्ञान जर अपूर्ण असेल तर सत्य ही आजच्या विज्ञानाच्या तराजूवर तोलणे अशक्य. खरा विज्ञानवादी सत्याचा स्वीकार करतो आणि सत्य तपासण्याचा मार्ग शोधतो. पण दुराग्राही सत्याचाच स्वीकार करत नाही. इथेच समस्या निर्माण होते. व्यर्थचे वादविवाद होतात. ज्ञानाचा प्रकाश सामान्य लोकांपर्यंत लवकर पोहचत नाही.
No comments:
Post a Comment