Thursday, November 12, 2020

कोविड : जबाबदार कोण?

 

माझ्या मोठ्या बंधूंना स्वर्गवासी होऊन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी मनात एकच विचार सतत घोळत आहे, योग्य उपचार मिळाला असता तर कदाचित् माझा भाऊ वाचलाहि असता. इतके दिवस ब्लॉगवर काहीही लिहले नाही आणि काहीही नवीन वाचलेहि नाही. शेवटी मनात साठलेले  सर्व गरळ बाहेर ओकण्याचा निश्चय केला. सर्व शिक्षित लोकांप्रमाणे माझ्या भावाचाहि आधुनिक चिकित्सा शास्त्रावर विश्वास होता. त्याला कोविड झाला.  हॉस्पिटलमध्ये त्याची प्रकृती खालावत गेली. आधी ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर, लाइफ सेविंग इंक्जेक्शन आणि शेवटी ओळख होती म्हणून अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी.... या प्रसिद्ध हॉस्पिटलचा संचालक भावाच्या चांगल्या ओळखीचा असल्यामुळे उपचारात हलगर्जीपणा झाला असे म्हणता येत नाही.

आधुनिक चिकित्सा शास्त्रात अनुसंधान आणि क्लिनिकल ट्रायलवर खर्या उतरलेल्या औषधांचा उपयोग केल्या जातो, मग ती औषधी रासायनिक असो, धातू पासून बनली किंवा हर्बल असो। आज कोविड वर आधुनिक चिकित्सा शास्त्रात औषध नाही. अश्या काळात आपला अहंकार सोडून दुसर्या  चिकित्सा पद्धतीने शोधलेल्या औषधांचा प्रयोग करण्यात काही गैर होते का? पण तसे न करता, दुसर्या शास्त्रातील औषधी बाबतीत मिडीयाच्या मदतीने दुष्प्रचार  करून  लोकांच्या मनात भ्रम पैदा केला. शेकडोंच्या संख्येने कोर्ट केसेस दाखल केले. उच्च न्यायालयाने  विचारले दाव्यात असत्य काय आहे, तर केस टाकणारे उत्तर देऊ शकले नाही. या दुष्प्रचारामुळे अधिकांश शिक्षित (?) वर्ग उपचारापासून वंचित राहिला. दुर्भाग्य त्यात माझा मोठा बंधूहि होता.

आपल्या मनात प्रश्न येणार मी हे का म्हणतो आहे. ज्यावेळी माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी संघर्ष करत होता, माझ्या रूममध्ये बसणाऱ्या एका सहकर्मीला कोविड झाला. आम्हा सर्वांचे टेस्ट झाले. एक एमटीएस जो काढा पिऊन यायचा नेगेटिव्ह निघाला. मी ऑफिसला जाणे सुरु केल्या पासून, एक आयुर्वेदिक कंपनीचे औषध घेणे सुरु केले होते. मीहि नेगेटिव्ह निघालो (माझ्या हृदयाची सर्जरी झालेली आहे,  सायनसचीहि समस्या आहे. या शिवाय  पेंक्रियाचा टीबीहि होऊन चुकलेला आहे). एक क्लार्क  पाजीटीव्ह निघाला. तो हळदीचे दूध घेणारा होता. तो घरीच राहिला दोन आठवड्यात ठीक होऊन ऑफिस मध्ये येऊ लागला. एक पीएस परिवार सहित पाजीटिव्ह निघाला. फरीदाबादच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती झाला. तिथे आधुनिक पद्धतीच्या उपचारा सोबत सामाजिक कार्यकर्ता काढा आणि योग  सुविधाहि पुरवत होते. तोहि  ठीक झाला पण प्रकृती पूर्ण बरी झालेली नाही, बहुतेक महागड्या औषधांचा दुष्परिणाम. माझ्या लेकीच्या सासरी  माझी लेक, सासरा आणि तिची भावजय हॉस्पिटलमध्ये नौकरी करतात. सर्व ठिकाणी कोविडचे रोगी आहेत. दीराचा डोळ्यांचा दवाखाना आहे. त्याला कोविड झाला. घरी सर्वांचे टेस्ट झाले, सर्व नेगेटिव्ह निघाले. दीरालाहि कुठलाहि त्रास झाला नाही. कारण,  हिमाचल मध्ये त्यांच्या भागात जंगलात भरपूर गिलोय होते. परंपरेने हिवाळ्यात गिलोय कापून वाळवून ठेवतात.  गिलोयचा चहा, दूध आणि इतर पदार्थांत  वापर करतात. यावरून निष्कर्ष निघतो स्वदेशी उपचार पद्धतीहि कोविड वर प्रभावकारी आहे आणि स्वस्तहि आहे.

कोविड काळात जर औषध नाही तर रोगींचा उपचार करण्यासाठी, आपली पद्धती श्रेष्ठ हा अहंकार सोडून,  सुरुवातीपासून आधुनिक चिकित्सा पद्धती सोबत  योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, इत्यादी सर्व पद्धतींचा गरजेनुसार वापर केला असता तर निश्चित हजारो लोकांचे प्राण वाचले असते. अखेर स्वास्थ्य मंत्रालयाने आयुर्वेदिक औषधीहि वापरण्याची अनुमती दिली. तो पर्यंत भरपूर उशीर झालेला होता. 

कोविड काळात एक मात्र निश्चित कळले. फक्त एका पद्धतीचे शास्त्र घेऊन आपण महामारीशी लढू शकत नाही. भविष्यात आधुनिक चिकित्सा शास्त्राचे शिक्षण घेताना स्वदेशी चिकित्सा पद्धतीचे ज्ञानहि भावी चिकित्सकांना मिळाले पाहिजे,  त्या शिवाय पुढील महामारींचे सामना आपण करू शकणार नाही. असो.


2 comments:

  1. खरच आहे.
    फार कळकळीने लिहिलेलिहिले आहे
    प्रसार झाला . पाहिजे

    ReplyDelete
  2. खरच आहे.
    फार कळकळीने लिहिलेलिहिले आहे
    प्रसार झाला . पाहिजे

    ReplyDelete