भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. या हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली. तरीही कालप्रवाहात लाखो ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील. देशाला स्वतंत्रता मिळाली. पण दुर्भाग्य असेकि गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच. विदेशी आक्रांतान्पासून आपले ज्ञान काही प्रमाणात वाचले पण काळ तर सर्वच नष्ट करणारा असतो. जीर्णशीर्ण पाण्डूलिपी किती काळ जिवंत राहणार. आपल्या सरकारी तंत्राने हि भारताचे प्राचीन ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. पण सरकारी तंत्राचीहि 'दिनभर चलेअढाई कोस' वाली गत असते.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल स्वरूपात प्राचीन ज्ञान सुरक्षित केले जाऊ शकते. पण ते करणे अचाट मेहनतीचे कार्य आहे. पाण्डूलिपी कुणापाशी आहेत त्याची माहिती मिळविणे. त्यांच्या पर्यंत कसे पोहचायचे. त्यांची परवानगी घेऊन, त्या जीर्णशीर्ण ताडपत्री पुस्तकांना दुरुस्त करणे. त्यासाठी भाषा विशेषज्ञ आणि दुरुस्ती कार्य करणाऱ्या तकनिकी लोकांची गरज. त्यानंतर पांडूलिपींचे डिजिटलीकरण करणे आणि शेवटी त्यांना सुरक्षित ठेवणे. ज्यांनी परत मागितली त्यांना परत करणे. दुर्लभ आणि मूल्यवान ग्रंथांचे प्रकाशत करून प्राचीन ज्ञान जनतेसमोर आणणे, इत्यादी. ह्या सर्व कार्यांत हजारो लोकांच्या अचाट मेहनत शिवाय, वेळ आणि धनाचीहि गरज लागते. शिवाय गुलाम मानसिकता असलेले सरकारी तंत्र किंवा जनताहि तुमच्या कार्याचा गौरव करणार नाही. मीडियाही तुमच्या कार्याची माहिती जनतेला देणार नाही. तरीही एका व्यक्तीने हे कार्य करण्याचा विडा उचलला.
त्रेता युगात महर्षी विश्वामित्र यांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. इंद्राचे सिंहासनहि गदागदा हालविलें होते. या कलयुगातहि बहुतेक त्यांचाच अवतार स्वामी रामदेवच्या रूपाने भारतात प्रगट झाला असावा हें मला नेहमीच वाटते. गुरुकुलात वेद शास्त्र संपन्न होऊन, हिमालयात तपस्या करून, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने भारताला पुन्हा उन्नतीच्या शिखरावर पोहचविणे हे त्यांचे स्वप्न. फूडपार्क पासून होणार २ टक्के नफा फक्त देशसेवेसाठी वापरायचा हा त्यांचा संकल्प.त्यात हि ७० टक्के फक्त रिसर्च आणि अनुसंधानावर.
स्वामी रामदेवांनी कार्य हातात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर हे कार्य करण्याचा निश्चय केला. आचार्य बाळकृष्णच्या नेतृत्वाखाली पतंजली युनिव्हर्सिटी आणि त्यांना मदत करणारे हजारो सहयोगी या कार्यात गुंतले. कुणालाही आश्चर्य वाटेल एवढे अचाट कार्य ६० हजारच्यावर पाण्डूलिपी ज्यात ५० हजारांच्यार ताडपत्री स्वरूपात. तब्बल १९ विषय - अलंकार शास्त्र, आयुर्वेद, ब्राम्हण ग्रंथ, दर्शन, धार्मिक ग्रंथ, ज्योतिष, काव्य, कोश, मंत्र, नीती ग्रंथ, पाकशास्त्र, पुराण, संस्कृत-साहीत्य, स्त्रोत्र, तंत्र, उपनिषद, वेद, व्रत, व्याकरण इत्यादी. १४ भाषा- देवनागरी, शारदा, श्री, गुरुमुखी, फारसी, संस्कृत, उर्दू, बंगाली, मल्याळी, मराठी, नेपाली, ओडीया,तमिळ तेलगु. २६ लाखांहून जास्त पाने.
आता विचार करा या अफाट कार्यासाठी हजारो लोकांशी/ संस्थांशी संपर्क करावा लागला असेल. अनेक भाषाविदांची मदत घ्यावी लागली. या पवित्र कार्यासाठी अधिकांशी विद्वानांनी कसले हि मानधन घेतले नाही. पण त्यांच्या येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च तर होताच. शिवाय पगारी कर्मचार्यांची फौजहि. या कार्यातहि सरकारी तंत्र नेहमीप्रमाणे उदासीन होता. आमच्या जवळ असलेले प्राचीन साहित्य तुम्हाला डीजीटलीकारण साठी काही काळासाठीहि देणार नाही आणि हे वेगळे आम्ही केंव्हा करू, आमचे आम्हालाच माहित नसते. असो.
डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. इथेहि समस्या होती. एक-एक पुस्तकाच्या अनेक पाण्डूलिपी आणि पाठभेद. विद्वानांच्या मदतीने प्रामाणिक प्रती तैयार करून एव्हढ्या कमी कालावधीत अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित केले. त्यांची नावे- सिद्धसार - संहिता (रविगुप्त- विरचित), योगशत्तम (अमितप्रभ्यम् - विरचित), योगशास्त्र-वैद्यवल्लभ (रुपनयन - विरचित), आयुर्वेद-महोदधी/ सुषेण-निघन्टु (सुषेण वैद्य- विरचित), भोजनकह्तुलम् (रघुनाथ सुरी -विरचित), अजीर्णमर्त मंजरी (काशिनाथ-विरचित), रुचिवधु- गल्- रत्नमाला (परप्रणव - विरचित), हरमेखला (मधुक-विरचित), योगरत्न समुच्चय (चंद्रात- विरचित), वैद्यशतश्लोकी (अवधान सरस्वती- विरचित), चंद्र निघन्टु/ मदनादी-निघन्टु (चंद्रनंदन-विरचित), हृद्यदीपक-निघन्टु (भोपदेव विरचित), राज- निघन्टु/ सोढलनिघन्टु (सोढल विरचित), मदनपाल -निघन्टु (नृप मदनपाल-विरचित), वैद्य प्रसारकम् (वैद्य गदाधर-विरचित ).
हे कार्य सतत चालणारे कार्य आहे. काळात विस्मृत झालेले ज्ञान विज्ञानाची पुस्तक रुपी रत्ने एका महाऋषीच्या प्रयत्नाने पुन्हा प्रगट होणार आहेत. आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे. या काळात आपले काय कर्तव्य आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. असो. खालील लिंकच्या आणि आस्थावर या संबंधात पाहिलेल्या कार्यक्रमाच्या आधारावर हा लेख आहे.
https://www.patanjaliresearchinstitute.com/ayurvedic_manuscripts.php#