हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर,मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली.
साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे, हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक, तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे) शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे. मीठ चवीनुसार.
कृती: गाजर आणि बीट किसून घेणे, मटार मिक्सर मधून वाटून घेणे. मिश्रण एका ताटात काढून त्यात हळद , तिखट, गरम मसाला, कसूरीमेथी, गरम मसाला मिसळावे. कसूरी मेथीचा ही एक वेगळा स्वाद येतो. (घरात कोथिंबीर नसेल तरी ही त्या एवजी कसूरी मेथी वापरता येते). मीठ सर्वात शेवटी अर्थात परांठे बनविण्याच्या वेळी टाकावे. कणकीची परी लाटून त्यात मिश्रण भरून परांठा गोल आकारात लाटून घ्या. तव्यावर पराठा भाजून घ्या (बिना तेल आणि तूप वापरता). गरमागरम परांठा सर्व करताना त्यावर लोणी किंवा तूप घाला. अत्यंत स्वादिष्ट लागेल. ज्यांना तेल आणि तूप टाकून परांठा खरपूस भाजायचा असेल ते तसे करू शकतात. (अस्मादिकांना तेल/ तूप कमी खाण्यास सांगितले आहे, काय करणार)
गरमागरम परांठा त्यावर गायीचे तूप, हिरवी चटणी, टमाटो साॅस व काळी मिरी टाकलेल्या दही सोबत परांठा खायला मिळाला. हा मिश्र परांठ खाताना खरंच मजा आली.
पौष्टिक पदार्थ (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी.
No comments:
Post a Comment