Wednesday, February 11, 2015

भाज्यांचे लोणचे


दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही  भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक-दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती.

साहित्य:

भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम

मसाले:  सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा),  हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे,  तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी. मीठ  आवश्यकतेनुसार.कृती:

प्रथम गोबी,गाजर आणि शलजम या तिन्ही भाज्यांचे एकसारखे तुकडे करून घ्या.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. एक उकळी आल्यावर पाण्यात १ चमचा हळद टाकून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तीन ते चार मिनिटांनी  गॅस बंद करून सर्व  भाज्या एका मलमलच्या कपड्यावर किंवा साडीवर पसरून वाळायला घाला. तीन चार तासात भाज्या वाळतील (अर्थात ओलसरपणा निघून जाईल).  अदरक किसून घ्या आणि लहसून बारीक वाटून घ्या. 

आता कढई गॅस वर ठेवा. 1 चमचा तेलात सौंप आणि मेथी दाने परतून घ्या. मग पुन्हा २ चमचे तेल टाकून अदरक आणि लहसून परतून घ्या.  त्या नंतर वाचलेले तेल   कढईत टाकून तेल गरम झाल्यावर  काळी मिरी टाका  (तेल गरम झाले कि नाही कळण्यासाठी). नंतर  गॅस बंद करा. एका भांड्यात सिरका व गुड घालून उकळायला ठेवा. गुड  विरघळल्या वर गॅसबंद करा.

एका परातीत किंवा भांड्यात  सर्व मसाला अर्थात - परतलेले अदरक, लहसून, सौंप (बडीशेप), मेथी दाणे व तिखट, हळद, मेथी दाणे, मीठ   व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर गरम तेल मसाल्यावर टाका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुड आणि सिरक्याचे मिश्रण मिसला. मसाला थंड झाल्यावर सर्व  वाळलेल्या  भाज्या मिसळा.
हे लोणचे १०-१२  दिवस आरामात टिकते.

कांजी / काळ्या गाजरापासून बनविलेले पेय
http://vivekpatait.blogspot.in/2014/01/blog-post_19.html

 

No comments:

Post a Comment