(पूर्वी ब्लू लाईन
चे नाव “रेड लाईन” असे होते. प्रशासकांना वाटले बहुतेक या नावामुळेच रस्त्यावर
रक्त सांडले जाते. त्यांनी नाव बदलून ब्लू लाईन असे केले. ही गोष्ट वेगळी
यमराजाच्या दरबारातली लाईन तरी ही कमी झाली नाही)
“चौधरी” –डीटीसी
कर्मचाऱ्याचे टोपण नाव
ब्लू लाईन कथा – फिरुनी नवी जन्मेन मी
सन १९८८, दिल्लीत डीटीसीच्या जवळ पास ३००० बसेस आणि
तेवढ्याच बसेस निजी मालकीच्या होत्या. बस
आणि चालक निजी मालकाची व कंडक्टर डीटीसीचा असायचा. बस मालकाला किलोमीटरच्या हिशोबाने मोबदला
मिळायचा. सर्व बसेस मधे मासिक, त्रेमासिक पास चालायचे. सर्वकाही सुरळीत सुरु होते.
अचानक एके दिवशी
डीटीसीत हडताल सुरु झाली. “चौधरी”
डीटीसीच्या हरी नगर डेपोत कार्यरत होता. ही हडताल आपल्या भल्या साठी आहे, हे समजून
अन्य कामगारांसमवेत तो ही यात शामिल झाला. हडताल अचानक संपली. हडताली नेता अदृश्य
झाले. चौधरी सहित मोठयाप्रमाणावर चालक, कंडक्टर व अन्य तकनीकी कर्मचार्यांना नौकरी
वरून कमी करण्यात आले.
मी ऑफिसला जाण्या
साठी. नेहमीप्रमाणे बस स्थानकावर पोहचलो. बसचा मालक ही जातीने बस स्थानकावर उभा
होता. त्याचा चेहरा आनंदी दिसत होता. मला पाहताच म्हणाला “पट्टेत साहब आजसे आपका
पास नाही चलेगा, टिकट खरीदना पडेगा”. किलोमीटर स्कीम बंद झाली होती. बस मालकाने त्या
साठी किमत मोजली होती आणि आता ऑफिसला जाण्या साठी मला ही जास्त पैसे मोजावे लागणार
होते. ही हडताल बस माफिया व भ्रष्ट राजनेत्यांनी
घडवून आणली होती. त्यात आहुती पडली ‘चौधरी” सारख्या कर्मचाऱ्यांची. परिणाम भोगावे
लागणार होते दिल्लीच्या जनतेला. डीटीसी कडे दुर्लक्ष करण्यात आले. डीटीसीच्या बसेस कमी झाल्या. डीटीसीचे पास अर्थहीन
झाले.
ब्लू लाईन वाल्यांची
मौज सुरु झाली. सवारी घेण्यासाठी बसेस एक-एक स्टाप वर ५-५ मिनटे थांबू लागल्या आणि
मुख्य रस्त्यांवर आल्यावर सवारी घेण्यासाठी त्यांचात रेस लागू लागली. परिणाम
रास्त्यांवर “रक्त सांडणे” ही रोजची बाब
झाली होती. शिवाय सकाळी आणि रात्री ९ नंतर बस मिळणे नामुष्कील झाले होते.
ब्लू लाईनचा अंत:
१९९३, दिल्लीला विधान सभेचे पहिली निवडणूक झाली. श्री मदन लाल खुराना दिल्लीचे
मुख्यमंत्री झाले. डीटीसी दिल्ली सरकारच्या अंतर्गत आली. श्री राजेंद्र गुप्ता, परिवहन मंत्री झाले. सर्वप्रथम त्यांनी ब्लू लाईन बंद केली. किलोमीटर स्कीम पुन्हा सुरु केली.
कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.
डीटीसीच्या बसेस दुरुस्त करण्यात आल्या.
नवीन बसेस ही घेण्यात आल्या. अस वाटल की ब्लू लाईन नेहमी साठी बंद
झाली. पण तसे होणे नव्हते.
ब्लू लाईनचे
पुनरागमन: श्री मदन लाल खुरानांची
लोकप्रियता पक्षश्रेष्ठींच्या नाकात खुपू लागली. त्यांचा जागी श्री साहिब सिंग
वर्मा हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी
ग्रामीण भागाच्या लोकांच्या सुविधेसाठी (?)
काही प्रमाणावर ब्लू लाईन पुन्हा सुरु केली. १९९८ च्या निवडणक जवळ आली. त्यावेळी श्रीमती सुषमा
स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. कांदा महाग झाला होता. त्या वेळी नॉर्थ ब्लाकच्या बसस्टाप वर डीटीसीचे
पास बनविले जात. मी पास बनविण्याच्या लाईनीत उभा होतो . तिथे “चौधरी” सर्वाना
ओरडून सांगत होता. थोडे दिवस कांदे महाग खाल्ले तरी काही फरक पडत नाही पण सरकार
बदलली तर पुन्हा ब्लू लाईन पुन्हा सुरु होईल. पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष
केले. राजेंद्र गुप्ता मोठ्या अंतराने
निवडणूक हरले. (ब्लू लाईन माफियाची कृपा). श्रीमती शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री
झाला. किलोमीटर स्कीम पुन्हा बंद केली.
ब्लू लाईनचा पुनर्जन्म झाला. पुन्हा डीटीसीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्यावर
डीटीसीच्या बसेस कमी होई लागल्या. जास्त कर्मचारी व कमी बसेस परिणामी डीटीसीचा
तोटा ही भयंकर रीतीने वाढू लागला. तेंव्हा
पासून मी ऑफिसला चार्टर बस मधून
जाण-येण करतो आहे. दुसरी कडे स्कूटर, मोटारसायकल, कर इत्यादी वाहनांची संख्या वाढू
लागली. प्राईवेट नौकरी साठी वाहन चालविता येण एक अतिरिक्त ‘योग्यता” झाली.
ब्लू लाईनचा पुन्हा
अंत: न्यायालयाने ब्लू लाईन बंद करण्याचे आदेश दिले. शिवाय कॉमनवेल्थ खेळ ही दिल्लीत करण्याचा
निर्णय घेण्यात आला होता. खेळाडूंसाठी
बसेसची आवश्यकता होती. ईज्जत-अब्रूचा प्रश्नही होताच. ३००० च्या जवळपास नवीन बसेस विकत घेण्यात आल्या आणि २५०० जवळपास जुन्या बसेसला पुन्हा रस्त्यावर
दुरुस्त करून आणण्यात आले. डीटीसी पुन्हा
जोमाने सुरु झाली. दोन करोडच्या वर एन सी आर च्या साठी या बसेस अत्यंत अपुऱ्या
होत्या.
ब्लू लाईनचा नवा जन्म:
ब्लू लाईन पासून सुटका मिळणे दिल्लीकरांच्या नशिबी नव्हते. रूप बदलून ब्लू लाईन पुन्हा परतली (अ) “ग्रामीण सेवा” या सेवेचा ग्रामीण भागाशी
काही ही संबंध नाही. विक्रम स्कूटर (खर तर
यात ३ आणि ३ असे ६ प्रवाश्यांसाठी बसण्याची व्यवस्था असते. पण मागचा भाग खुला करून
तिथे एक फळी टाकून १२ प्रवासी + २ चालकाच्या शेजारी असे १४ किंवा १५ प्रवासी विक्रमस्कूटर मध्ये बसतात. ही सेवा चालली पाहिजे म्हणून पुष्कळ मार्गांवर
डीटीसी सेवा ही अस्तित्वात नाही आहे. उदाहरण उत्तम नगर पासून –हरी नगर घंटाघर
(तिथे एक मोठे सरकारी होस्पिटल आहे- सुमारे ६ किलोमीटर) ला जायचे असेल तर या ग्रामीण सेवेतच बसावे
लागेल. अर्थात ‘जान जोखीम’ मधे राहीलच. (ब) शिवाय मेट्रो स्टेशन पासून १० सिटर अशा
मिनी बसेस मेट्रो बनल्या पासून सुरु झाल्या होत्या. या वर्षी त्या मोठ्या होऊन २०
सिटर झाल्या. कश्या हे कळण्याचा मार्ग नाही.
या दोन्ही सेवा रस्त्याच्या मध्ये गाड्या उभ्या करून सवार्या घेतात,
ट्राफिक जाम करतात आणि पूर्वीच्या ब्लू लाईन प्रमाणे रास्त्यांवर रेस ही लावतात. शिवाय ‘क्लस्टर बसेस” या नावाने काही मार्गांवर
किलोमीटर पद्धतीने नवी स्कीम ही सुरु गेली आहे. भविष्यात ही स्कीम पुन्हा
ब्लू-लाईन मधे परिवर्तीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असो, जो पर्यंत दिल्लीत ब्लू लाईन माफियाची
‘चलती’ आहे तो पर्यंत दिल्लीकरांना ब्लू लाईन पासून मुक्ती मिळणे शक्य
नाही.
No comments:
Post a Comment