ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
(शांतीपाठ)
ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.
[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]

ईशान उपनिषद शांतीपाठा पासून सुरु होतो. ऋषी म्हणतात पूर्णातून पूर्ण निघत गेले तरी ही पूर्णच शेष राहिले. ईशान उपनिषदात पहिल्या मंत्रात ऋषी म्हणतात ‘त्याग सहित उपभोग’ करा. दुसऱ्याचा वाट्यावर हक्क सांगू नका. परमेश्वराने, प्रत्येकासाठी वेगळा वाट ठेवला आहे, आपल्या वाट्याचा उपभोग करीत प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. दुसऱ्या मंत्रात ऋषी म्हणतात अशा रीतीने शंभर वर्ष जगण्याची इच्छा केली तरी ही कर्म बंधन मानवाला बांधू शकत नाही.
उपनिषदकार ऋषींना “मंत्रदृष्टा” का म्हणतात हे ईशान उपनिषद वाचल्या वर कळते. भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची क्षमता त्यांचात होती. ब्रह्मा द्वारा निर्मित पृथ्वी समस्त जीव व जाती ही कधी तरी नष्ट होणारच हे सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने जगले पाहिजे आणि त्या साठी मंत्रदृष्टा ऋषीने या मंत्रांद्वारे आपल्याला मार्ग दाखविला आहे.
पृथ्वीवरील आजचे वातावरण मानव आणि आज अस्तित्वात असेलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अनुकूल असे आहे. अर्थात वातावरणातील हवा (गॅस),पाणी आणि माती यांचे संतुलन. जो पर्यंत हे वातावरण अनुकूल राहील मानवाचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून राहील. पण माणूस बुद्धिमान आणि स्वत:ला भगवंताहून अधिक श्रेष्ठ समजतो. आपल्या स्वार्थासाठी वातावरणात बदल करण्याची क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी इतर प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वर्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे कस समजत नाही पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले तर मानवजाती ही नष्ट होईल. आपल्याच कर्माचे परिणाम मानवाला भोगावे लागेल. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे जेणे करून मानवजाती आपले अस्तित्व पृथ्वी वर टिकवू शकेल अर्थात आपली शंभर वर्ष जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल याचे मार्ग दर्शन ऋषीने केले आहे.
‘रोटी कपडा आणि मकान’ आपल्या तीन मूलभूत गरजा आहे. या साठी आपण काही वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि काहींचा ‘उपभोग’ करतो.
ऋषी “उत्पादन” या शब्दाचा अर्थ सांगतात, “पृथ्वीवरील वातावरणातल्या संतुलनात कुठलाही बदल न करता जी निर्मिती होते तिलाच आपण “उत्पादन’ हे म्हणू शकतो”. याच उत्पादित पदार्थांचा आपण उपभोग करतो. पण इथे प्रश्न उठतो कुठलीही वस्तूची निर्मिती वातावरण संतुलनात बदल केल्या शिवाय कसे शक्य आहे. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देतात जे काही आपण उपभोग करतो “त्याचा त्याग करा”.
उदाहरणार्थ: झाड-झुडपी ही जमिनीतून भोज्य पदार्थ व पाणी इत्यादी घेतात बदल्यात पिकलेली पाने परत जमिनीला परत करतात. वातावरणात प्राणवायू निर्माण करतात. पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात. जनावरे चारा खातात आणि विष्टा परत करतात. अशारीतीने वातावरणातले संतुलन कायम राहते. पण माणसाच्या गरजा मोठ्या आहे. उदाहरणार्थ जाळण्यासाठी, फर्निचर व घरांसाठी आपण लाकूड वापरतो पण तेवढेच झाडे लावून त्यांची पूर्ती करतो का? पृथ्वीच्या गर्भातून कोळसा व पेट्रोलियम पदार्थ काढून ‘दूषित वायू’ वातावरणात उधळतो या मुळे हवेतील प्राणवायू कमी होत चालली आहे. या मुळे वातावरणातले संतुलन बिघडत चालले आहे. ही ‘दूषित वायू’ परत पृथ्वीच्या गर्भात टाकण्यासाठी आपण काय करीत आहोत. जर आपल्याला हे करणे शक्य नाही तर या पदार्थांचा वापर कशाला?
आपल्या स्वार्था साठी आपण दुसऱ्यांचा जगण्याचा हक्क आपण काढून घेत आहोत. कळत, असूनही पृथ्वीवरचे वातावरण दूषित करीत आहोत. अधिक काळ जर माणसाची अशीच प्रवृत्ती राहील तर मानवाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील व मानवजाती ही नष्ट होईल.
सारांश: जे काही आपण वातावरणातून घेतो ते आपल्याला परत करता आल पाहिजे. अन्यथा त्या पदार्थांचा उपभोग करण्याचा मोह टाळावा. ज्या पदार्थांना मानवाला परत करणे शक्य आहे त्यांचाच उपभोग घ्यावा अर्थात त्याग सहित भोग म्हणजे “सर्वोत्तम उपभोग”. अशा रीतीने जगल्यास आपण निश्चित शंभरी गाठू शकू.

No comments:
Post a Comment