Tuesday, November 26, 2024

आकड्यांचे विश्लेषण: महाराष्ट्राचा निकाल

महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के  मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते. याचा परिणाम दोन्ही वेळा लोकसभेत सात ही जागा भाजप ने जिंकल्या. ज्या राज्यांत अल्पसंख्यक मतदाता 10 टक्के पेक्षा जास्त आहेत त्या राज्यांत जास्त मतदानाचा फायदा भाजपला होतो. दिल्लीत जर आगामी विधान सभा निवडणूकीत जर महाराष्ट्र प्रमाणे 66 टक्के मतदान झाले तर भाजप दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकू शकते. निष्कर्ष एकच -महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत अर्धा टक्के मतांचा परिणाम एनडीएला लोक सभेत भोगावा लागला होता. विधानसभेत मतदान 5 टक्के जास्त झाल्याने महाराष्ट्रात त्सुनामी येणारच होती. 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 2019 पेक्षा 5 लाख मते जास्त पडली होती. महा विकास आघाडीला (राऊंड फिगर)  2.50 कोटी मते मिळाली होती तर महायुतीला 2.48 कोटी मते मिळाली होती. मतांचे अंतर 2 लक्षपेक्षा कमी होते. भाजपला 2019च्या  लोकसभा निवडणूकीत 1.49 कोटी मते मिळाली होती जवळपास तेवढीच मते 2024 लोकसभा निवडणूकीत मिळाली होती. भाजपा लोकसभेच्या निवडणूक निकालात विधानसभेच्या 83 जागांवर पुढे होती. शिंदे सेनेला 73.77 लक्ष मते मिळाली आणि ती विधानसभेच्या 38 जागांवर पुढे होती. अजित दादांच्या एनसीपीला 20.53 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 6 जागांवर पुढे होती. महायुती विधानसभेच्या 128 जागांवर  पुढे होती. अर्थात फक्त बहुमतापेक्षा 17 जागा  कमी होत्या. 

कॉंग्रेसला लोकसभेत 96.40 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 63 जागांवर पुढे होती. शरद पवारच्या एनसीपीला 58.50 लक्ष  मते मिळाली ती  विधानसभेच्या 32 जागांवर पुढे होती. ठाकरे सेनेला 95.23 लक्ष मते मिळाली होती. ती 56 जागांवर पुढे होती. अर्थात लोकसभा निवडणूकेनुसार विधानसभेत 151 जागांवर महा विकास आघाडी पुढे होती. बहुमत  पेक्षा फक्त 7 जागा जास्त

विधानसभा निवडणूकीत भाजपला 1.73 कोटी अर्थात 24 लक्ष मते जास्त मिळाली. शिंदे सेनेला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा जवळपास 6 लक्ष जास्त मते मिळाली. इथे मजेदार बाब अशी की शरद पवारांच्या एनसीपीला ही जवळपास 73 लक्ष मते मिळाली. तिला लोकसभेपेक्षा जवळपास 14 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ कांग्रेस आणि उद्धव सेनेच्या अधिकान्श समर्थकांची मते शरद पवारांच्या एनसीपीला मिळाली. अजित पवारांना 58 लक्ष मते अर्थात तब्बल 38 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ भाजप आणि शिंदे समर्थकांनी आपली 100 टक्के मते दादांच्या कडे वळवली. भाजप मतदार पक्षा प्रति किती एकनिष्ठ आहेत, याची कल्पना येते. दादा आणि शरद पवारांना मिळालेल्या मतांच्या आधारावर माझा निष्कर्ष - बहुतेक दादांच्या मतांमध्ये 50-60 टक्के मते भाजप आणि शिंदे समर्थकांची असण्याची शक्यता जास्त. युतीत राहणे दादांना जास्त फायद्याचे आहे. 
 
मग मते कुणाला कमी मिळाली, हा प्रश्न समोर येणारच. कॉंग्रेस पक्षाला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा 16.40 लक्ष मते कमी मिळाली. उद्धव सेनेला 64.43 मते मिळाली, लोकसभेपेक्षा तब्बल 30 लक्ष मते कमी मिळाली. 

उद्धव सेनेला विधानसभा निवडणूकीत लोकसभेपेक्षा 30 लक्ष मते कमी मिळाली. लोकसभा निवडणूकीच्या वेळी उद्धवला शिवसैनिकांची सहानभूती मिळाली. अधिकान्श शिवसैनिकांना वाटत होते, भाजपला धडा शिकवून, उद्धव पुन्हा भाजप सोबत युती करतील. लोकसभेत भाजपला पाठिंबा देतील. पण असे काही घडले नाही. आपल्या सैनिकांच्या मनात काय आहे, हे उद्धवला कळले नाही. अधिकान्श हिंदुत्ववादी शिवसैनिक निराश झाले. विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या बाजूने मतदान केले. कॉंग्रेस आणि अल्पसंख्यक मतांची साथ मिळाली नसती तर शिवसेनेचे 5 आमदार ही निवडून  आले नसते. 

कांग्रेस भाजप विरुद्ध 74 जागांवर लढत होती. त्यातल्या फक्त दहा जागा कांग्रेस ने जिंकल्या. याचा एकच अर्थ होतो,अधिकान्श जागांवर उद्धव सेनेच्या समर्थकांची मते काँग्रेसला मिळाली नाही. त्यांनी पूर्वी प्रमाणे भाजपला मतदान केले.  माझा निष्कर्ष- महाराष्ट्रात कांग्रेसने पुढे स्वबळावर निवडणूक लढवावी. उद्धव सेनेसोबत युती करण्याचा काहीही फायदा कांग्रेसला मिळणार नाही. 

या वेळी मतदान जास्त होण्याचे कारण मौलवींचे फतवे, त्यांच्या 25 कलमी मागणीवर कांग्रेसचा सकारात्म्क प्रतिसाद. याशिवाय बंगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते मौन राहिले. योगींच्या "एक रहा, सेफ रहा" चा प्रभाव ही मतदारांवर पडला. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात एक गठ्ठा मतदान केले. यावेळी शिक्षित मतदारांनी ही मतदानात भाग घेतला. माझ्या अनेक पुणेकरी मित्रांनी प्रथमच मतदान केले.   

महाराष्ट्राचा हा निकाल अनेपक्षित नव्हता, हा निष्कर्ष आकड्यांवरून सहज काढता येतो.   






Monday, November 25, 2024

इलेक्शनी चारोळ्या

 
(१)
समुंदर हूं मैं
लौटकर आऊंगा.
त्सुनामी घेऊन आला
वाहून गेले त्यांचे
स्वप्नांचे मनोरे.

(२)
चित भी मेरी
पट भी मेरी
सरडे माझे
सारे जिंकले.

(३)
शेअर बाजाराचा फंडा
त्याला कळलाच नाही.
शॉर्ट टर्म गेन साठी 
लाँग टर्म तोटा केला.









Wednesday, November 13, 2024

ईस्ट इंडिया कंपनी सर्व्हे: भारतीयांना निरक्षर करणारे ब्रिटिश शासन

 
आजच्या शिक्षणाचे दोन वाक्यात वर्णन करता येते. पहिले वाक्य विषय पाठ करा. दुसरे वाक्य पाठ केलेले कागदावर लिहा किंवा टंकित करा. आपल्या देशातील मैकाले शिक्षण व्यवस्थेत 90 टक्के शिक्षण यातच येते. सरकारी नौकरी सोडून कुठेही व्यवहार आणि कौशल रहित या शिक्षणाचा उपयोग नाही. 21 वर्षे (18+3) वर्ष शिक्षण घेऊन ही अधिकान्श तरुणांसमोर पुढे काय कराचे हा भला प्रश्न चिन्ह असतो. मग शिक्षण कसे असावे हा प्रश्न मनात येणार. याचे एक उत्तर अथर्ववेदात गुरुकुलात प्रवेश करताच आचार्य त्यावर कोणते संस्कार केले पाहिजे यात सापडले.

आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं कृणुते गर्भमन्तः
तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति तं जातं द्रष्टुमभिसंयन्ति देवाः
अथर्व० ११।५।३

शब्दार्थ : आचार्य उपनयन संस्कार करून शिष्याला गुरुकुलात प्रवेश देतो. ज्या प्रमाणे आई आपल्या उदरात गर्भाचे पोषण करते तसेच आचार्य तीन रात्री शिष्याचा सांभाळ करतो. त्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होतो. त्या तेजस्वी ब्रह्मचारीला आशीर्वाद देण्यासाठी देवता/ विद्वान जन तिथे येतात.
 
इथे तीन रात्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. रात्र म्हणजे अज्ञान. अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण. त्यासाठी तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक विद्यार्थीला गरजेचे. अज्ञानी ब्रम्हचारी हा पशु समान असतो. आचार्यचे पहिले कार्य आपल्या शिष्यावर  करणे. शरीर आणि मन सदृढ असल्या शिवाय ज्ञान प्राप्ती संभव नाही. शरीराने अशक्त शिष्य ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ ठरतो.  विद्यार्थी, धैर्यवान, क्षमाशील, संयमी, शरीर आणि मन शुद्ध ठेवणारा, चोरी करणारा, असत्य बोलणारा, इंद्रियांवर नियंत्रण असलेला अर्थात हिंसा, द्वेष, लोभ, मोहांपासून दूर राहणारा, मानवीय गुणांनी संपन्न असा निर्मित झाला पाहिजे. त्या शिवाय विद्यार्थी चांगल्या मार्गाने आपले ज्ञान वाढवू शकणार नाही.

प्राचीन गुरुकुलात सुरुवातीच्या चार ते पाच वर्ष विद्यार्थी स्थानीय भाषा, गणित, गो पालन, कृषि संबंधित त्या वेळचे  उपलब्ध ज्ञान प्राप्त करायचे. विद्यार्थी बारा -तेरा वर्षाचा झाल्यावर विद्यार्थिच्या योग्यतेनुसार वैद्यकिय ते शिल्पकलेचे इत्यादि विषयांचे शिक्षण दिले जात होते. जो विषय शिकविला जातो तो शिष्याला 100 टक्के आत्मसात झाला पाहिजे, हा प्रयत्न राहायचा. एक विद्यार्थी 8 वर्षांत ज्ञान प्राप्त करत असे तर दुसर्‍याला 16 वर्ष ही लगायचे. 33 टक्यांवर पास करून गाडी पुढे ढकलण्याची परंपरा त्याकाळी नव्हती.

गुरुकुलांत शिक्षणाचा उद्देश्य विद्येचा व्यावहारिक पक्ष ही शिष्याने आत्मसात केला पाहिजे हा होता. त्यासाठी शिकलेले ज्ञान प्रयोग करण्याची कुशलता त्याला आली पाहिजे. गांधीवादी लेखक धर्मपाल यांनी मेकाले पूर्व भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती त्यांचा उल्लेख आपल्या "रमणीय वृक्ष' (The Beautiful Tree) या पुस्तकात केला आहे. यात विलियम अडम्स, जी.डब्लू लिटणर सहित अनेक ब्रिटीश अधिकार्यांनी १८२० ते १८४० च्या कालखंडात पंजाब, मुंबई, बिहार, ओडिशा, बंगाल आणि चेन्नई प्रांतात केलेले भारतीय शिक्षणाचे दस्तावेज आहेत. या दस्तावेजानुसार काही निष्कर्ष मी काढण्याचा प्रयत्न केला.
 
शिक्षण सर्व जातीतल्या मुलांसाठी खुले होते. मद्रास प्रांतात तिन्नेवेली जिल्ह्यात शुद्रांची संख्या ८४ टक्के तर, सेलम मध्ये ७०टक्के होती.  ब्राम्हणांची मुले ते ६व्या वर्षी तर शुद्रांची ते वर्ष झाल्यावर शिक्षण सुरू करायची. प्राथमिक शिक्षण ज्यात विद्यार्थी  स्थानीय भाषा, गणित, गो पालन, कृषि संबंधित त्या वेळचे सामान्य ज्ञान प्राप्त करायचे. आजच्या हिशोबाने वी पास झाल्यानंतर विभिन्न प्रकारचे कौशल धातू विद्या, लोह, तांबा पितळ, स्वर्ण इत्यादी. लाकडाचे कार्य, दगडावर शिल्प, तलावांची निर्मिती, स्थापत्य कला, साबण निर्मिती, विभिन्न प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती, इत्यादी इत्यादि. या शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र आयुर्वेद आणि  औषधी निर्मिती, सांख्य, साहित्य, तंत्र शास्त्र हि शिकवल्या जात असे. १८२५ मध्ये चेन्नई प्रांतात ,५०,००० विध्यार्थी शिक्षा ग्रहण करायचे इंग्लेंड पेक्षा दुप्पट.

बिहार आणि बंगाल मध्ये लाख गुरुकुल होते. १०० उच्च शिक्षा देणारे संस्था होत्या. वस्त्र, भोजन, निवारा इत्यादी सुविधा स्थानिक गावातील लोक पुरवायचे. अधिकांश शिक्षक ब्राह्मण कायस्थ असले तरी ३० जातींचे शिक्षक गुरुकुलांत होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक त्याकाळी सर्वात  अंत्यज समजणार्‍या चांडाळ जातीचे होते. दक्षिणेत ब्राम्हणेतर शिक्षकांची संख्या ७० टक्के पेक्षा जास्त होती. 

त्याकाळी अस्पृश्यता असली तरी शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले होते. मलबार जिल्ह्यात वैद्यक शास्त्र शिकणाऱ्या १९४ विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के शूद्र  होते. फक्त ३१ ब्राह्मण होते. तर खगोल शास्त्र शिकणाऱ्या ८०० पैकी फक्त १३१ ब्राम्हण होते. स्त्री शिक्षणाचे म्हणाल तर, ब्राम्हण मुली ३७ टक्के तर वैश्य शूद्र इत्यादी ११ ते १९ टक्के. त्याकाळी भारतात बहुतेक जगात सर्वात जास्त स्त्री शिक्षण होते. याचा अर्थ 1857 आधी जगात सर्वात जास्त साक्षरता भारतात  होती. 

1857 नंतर ब्रिटीशांनी आपल्या शक्तीच्या जोरावर त्यांची आर्थिक नाळ कापून टाकली. सर्व गुरुकुलांना समाप्त केले. गावो गावी असलेले गुरुकुल समाप्त झाले. पुढील दोन पिढीतअर्थात 50 वर्षांत, देशाची अधिकान्श जनता साक्षर पासून निरक्षर झाली. कारण ब्रिटीशांनी 6 लक्ष गुरुकुल नष्ट केले पण शाळा मात्र काही हजारच उघडल्या त्या ही मोठ्या शहरांमध्ये.  याचा सर्वात जास्त फटका आजच्या भाषेत म्हणाल तर ओबीसी आणि दलित समुदायला बसला. 90 टक्के दलित समुदाय निरक्षर झाला. ब्रिटीशांनी प्रचार माध्यम आणि खोट्या इतिहासाच्या माध्यमातून यासाठी उच्च वर्गाला जवाबदार ठरविले. थोड्या बहुत ब्राम्हण आणि वैश्य जनतेला घरात किमान साक्षर होण्याचे शिक्षण मिळत होते. उत्तर भारतात शिक्षण संपूर्णपणे नष्ट झाले. फक्त दक्षिण भारतात, काही गुरुकुल ब्राह्मणांनी उपाशी राहून सुरू ठेवली. त्यामुळे वेदांचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान वाचले. पण शहर असो की वाळवंट पाणीदार घरे आणि तलाव कुठे आणि कसे बांधायचे विद्या जवळपास नष्ट झाली. आजच्या वास्तुविदांना हे ज्ञान नाही. बहुतेक शिकविला जातच नाही. असो. 

ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वेक्षणानुसार साक्षर भारतीयांना निरक्षर बनविण्याचे कार्य ब्रिटीशांनी मेकाले शिक्षण लादून केले. आज जे स्वताला मागास म्हणवितात, अश्या जनतेला ब्रिटीशांनी निरक्षर आणि मागास  बनविले  हे ही समजते.